शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद!

By admin | Updated: May 16, 2017 01:49 IST

महावितरण हतबल : १३०० पंपाचे उद्दिष्ट; कार्यान्वित झाले २५०

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतीला अखंडित वीज मिळावी, वीज देयकांचा खर्च कमी व्हावा, या उद्देशाने अंमलात आलेल्या सौर कृषी पंप योजनेला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत असून, १३०० पंप मंजूर असताना १५ मे अखेर केवळ २५० पंप कार्यान्वित झाले आहेत. शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी आणि हरित उर्जेसाठी शासन स्तरावरून सौर कृषी पंप योजना अंमलात आली. अपारंपरिक उर्जास्रोतांपैकी सौर ऊर्जा हा स्रोत शाश्वत आणि निरंतर असल्याची बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याच्या वाट्याला ७५० ए.सी. आणि ५५० डी.सी., असे एकंदरित १ हजार ३०० पंप आले आहेत. तथापि, योजनेचा लाभ देताना पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ३.५ किंवा ७.५ अश्व क्षमतेचे सौर कृषी पंप दिले जात आहेत. त्याकरिता शासनाकडून ९५ टक्के अनुदान देय आहे; तर पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ८५ टक्के अनुदान दिले जात आहे. असे असताना जिल्ह्यात या योजनेला फारच अल्प प्रतिसाद मिळत आहे. १५ मे अखेरपर्यंत या योजनेंतर्गत १२५४ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. त्यापैकी ६७१ प्रस्तावांना महावितरणकडून मान्यता देण्यात आली. मात्र, ६७१ पैकी केवळ २७४ लाभार्थींनीच त्यांना देय असलेला लाभार्थी हिस्सा भरला असून, इतर ३९७ लाभार्थींनी यासंदर्भात उदासीनता दर्शविली आहे. त्यातही प्रत्यक्षात केवळ २५० कृषी पंपच आतापर्यंत कार्यान्वित होऊ शकले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांनी दिली.अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी योजना फायदेशीरजिल्ह्यातील अतिदुर्गम भागात वास्तव्य करणाऱ्यांना विविध कारणांमुळे विजेपासून वंचित राहावे लागते. त्यांच्यासाठी सौर कृषी पंप योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय अद्याप विद्युतीकरण न झालेली गावे, महावितरणकडे पैसे भरुनही तांत्रिक कारणांमुळे वीज पुरवठा होत नसलेले शेतकरी आदींनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. सौर कृषी पंपाची योजना प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी आहे. शेतीला अखंडित तथा हक्काची वीज मिळण्यासोबतच वीज देयकांच्या खर्चातूनही शेतकऱ्यांना मुक्ती मिळणार आहे. विशेष म्हणजे लाभार्थींना केवळ ५ टक्के हिस्सा भरावा लागत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम