शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘भेटी-गाठी’साठी मिनी मंत्रालय ग्रामस्थांच्या दारी!

By admin | Updated: August 22, 2016 23:59 IST

शौचालय उभारण्याचा आग्रह : स्वच्छतेसाठी वाशिम जिल्हा परिषदेची संपूर्ण टीम प्रयत्नशिल.

वाशिम, दि. २२ : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ह्यभेटी-गाठी स्वच्छतेसाठीह्ण या उ पक्रमाच्या व्यापक जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी सोमवारी ग्रामस्थांच्या दारी पोहचले आहेत. वाशिम तालुक्यातील सोनखास या गावांपासून या उ पक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑ क्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत वाशिम जिल्ह्यातील शौचालय नसलेल्या ३५ हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले आहे. त्यानुसार, सोमवारी दुपारी १२ वाजता या मोहिमेस वाशिम तालु क्यातील सोनखास येथून थाटात प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्यासह जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पंचायत समितीचे सभापती गजानन भोने, सुभाष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हरिदास कोरडे, गटविकास अधिकारी बचुटे, पंचायत समिती सदस्य आशा गोरे, सरपंच अनुसया गोरे, उपसरपंच शोभा गोरे, डिगांबर गोरे, साहेबराव गोरे, तालुका समन्वयक विलास मोरे, संतोष बोरकर, नंदु इंगळे आदिंची उ पस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी गावातील घरोघरी जावून महिलांकडे शौचालय बांधण्याचा आग्रह धरला. शौचालय नसलेल्या कुटूंबांकडून शौचालय बांधण्याची तारीख घेतली. अनेक कुटुंबांनी दोन दिवसात शौचालय बांधण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. तद्वतच शौचालयासाठी खड्डे खोदलेल्या काही कुटुंबांच्या शौचालय बांधकामाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. केवळ पैसे मिळतात, या मानसिकतेने शौचालय न बांधता ती एक महत्वाची गरज समजून शौचालय उभारा व त्याचा नियमित वापर करा, असे आवाहन हर्षदा देशमुख यांनी केले. सहायक गटविकास अधिकारी कांबळे, जिल्हा कक्षाचे माहिती व संवाद सल्लागार राम श्रृंगारे यांनी अभियानाची माहिती दिली.