शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दस-याला कोट्यवधींची उलाढाल

By admin | Updated: October 13, 2016 02:00 IST

वाशिम जिल्ह्याचे गत तीन वर्षांचे रेकॉर्ड मोडीत; खरेदीसाठी बाजारपेठेत उडाली झुंबड.

संतोष वानखडेवाशिम, दि. १२- यावर्षी निसर्गाने साथ दिल्याने, जिल्ह्यातील बाजारपेठांनी दसर्‍यानिमित्त अच्छे दिनह्णचा अनुभवला घेतला. साडेतीन मुहूर्तांंपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दसर्‍यानिमित्त वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सराफा आदी बाजारपेठेत सुमारे साडेआठ ते नऊ कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापार्‍यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. गत तीन वर्षांपासून जिल्हावासियांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दसर्‍यानिमित्तच्या बाजारपेठेतील उलाढालही काही अंशी मंदावली होती. यावर्षी सुरूवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावून सर्वांंनाच ह्यखूषह्ण केले. दसर्‍यापूर्वी दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठी भाविकांची मोठय़ा संख्येने बाजारपेठेत गर्दी दिसून आली. यावर्षी निसर्ग ह्यप्रसन्नह्ण असल्याची बाब हेरून व्यापार्‍यांनीदेखील ग्राहकांसाठी बाजारपेठ सज्ज ठेवली. वाशिम येथील पाटणीचौक स्थित बाजारपेठ, सराफा लाईन येथे दसर्‍याच्या दिवशी ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. गत तीन वर्षांंच्या इतिहासात यावर्षीच्या दसर्‍याची वाहन खरेदी ही विक्रम करून गेली. विविध प्रकारच्या वाहन विक्रीतून साडेचार ते पाच कोटींची उलाढाल झाल्याचा दावा शोरूम संचालकांनी केला. शहरातील एकट्या सोहन ऑटोबाईक्स शोरूममधून तब्बल ३२१ दुचाकींची विक्री झाल्याचे संचालक राम ठाकरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. गत तीन वर्षांंतील हा उच्चांक असल्याचेही ठाकरे म्हणाले.दसर्‍यानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये झुंबड उडाली होती. रेडिमेड कपड्यांनाच मागणी होती. रेडिमेड कपड्यांसोबतच विविध पॅटर्नच्या साड्याही दसर्‍यानिमित्त बाजारपेठेत आल्या आहेत. वेगवेगळ्या पॅटर्नच्या साड्यांना महिला वर्गातून मोठी पसंती असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. कापड बाजारातून ५0 ते ५५ लाखांची उलाढाल झाल्याचा दावा कापड व्यापार्‍यांनी केला.इलेक्ट्रॉनिक्स बाजारातही एलईडी टीव्ही, संगणक, लॅपटॉप, मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रीज यासह अन्य वस्तूंची खरेदी ग्राहकांनी केली. इलेक्ट्रॉनिक्स बाजारात ४५ ते ५0 लाखांच्या दरम्यान उलाढाल झाल्याचे सांगितले जाते. यावर्षी सराफा बाजारात फारशी तेजी नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष उकळकर यांनी सांगितले.विविध वस्तूंच्या खरेदीवर विविध आकर्षक योजना जाहीर होत्या. तसेच विविध अर्थसहाय्य कंपन्यांच्या सुलभ हप्त्यांचीही योजना असल्याने बाजारपेठेतील उलाढाल वाढल्याचे व्यापार्‍यांकडून सांगितले जाते.