शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाहतुकीतून लाखोंची उलाढाल

By admin | Updated: November 20, 2015 02:11 IST

खासगी वाहनांच्या प्रवास भाड्यात भरघोस वाढ ; वाशिम जिल्हय़ात महामंडळाच्या ७५ अतिरिक्त बसफे-या.

वाशिम: दिवाळीदरम्यानच्या प्रवासी वाहतुकीने जिल्हय़ात लाखो रुपयांची उलाढाल होत असून, खासगी प्रवासी वाहतुकीच्या मनमानी प्रवास भाड्याचा भुर्दंड प्रवाशांच्या खिशाला बसत आहे. जिल्हय़ातील चारही आगारांना ८ ते १८ नोव्हेंबरदरम्यान २९ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. दिवाळीचा उत्साह ओसरून आठ दिवस लोटत आहेत; मात्र अजूनही एसटी महामंडळाच्या बसेस तसेच खासगी ट्रॅव्हल्समधील गर्दी फारसी ओसरली नसल्याचे दिसून येते. जिल्हय़ातील सर्व आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी असून दिवाळीदरम्यान प्रवासातूनही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रवाशांची गर्दी कॅश करण्यासाठी महामंडळाने ८ ते २५ नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यात १0 टक्क्यांची वाढ केली. या वाढीमुळे ग तवर्षीपेक्षा यावर्षी जिल्हय़ातील चारही आगारांना जास्त उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येते. वाशिम आगाराला १0 लाख, रिसोड आगाराला ५ लाख, मंगरुळपीर आगार सहा तर कारंजा आगाराला ८ लाख रुपयांच्या आसपास उत्पन्न अतिरिक्त बसेसने मिळवून दिले आहे. शाळेला सुट्या लागल्या की दिवाळी साजरी करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसर्‍या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांची चिक्कार गर्दी होत अस ते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. चिक्कार गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही तसेच सदर गर्दी व्यावसायिक दृष्टिकोनातून कॅश करण्यासाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आहे. वाशिम आगाराने ३२, रिसोड आगाराने २८, मंगरुळपीर आगार नऊ आणि कारंजा आगाराने सहा अशा एकूण ७५ अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या आहेत. दिवाळीदरम्यान प्रवाशांची चिक्कार गर्दी झाली होती. दिवाळी संपूनही गर्दी कमी होत नसल्याची आताची परिस्थिती आहे. जिल्हय़ातील प्रत्येक बसस्थानकात बस आल्यानंतर प्रवासी त्या बसला गराडा घालत असल्याचे चित्र आहे. जागा मिळविण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू असल्याचे दिसून येते. रिसोड बसस्थानकामध्ये आताही प्रवाशांची गर्दी असल्याचे दिसून येते. दिवाळीदरम्यानच्या २८ जादा बसेसने रिसोड आगाराला ४ लाख ९३ हजार ५४0 रुपयांचे उत्पन्न १८ नोव्हेंबरपर्यंंत मिळवून दिले आहे. अजून कॉन्व्हेंट व शाळेला सुट्या असल्याने बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून येते. मंगरुळपीर आगाराने नऊ बसेस जादा सोडल्या आहेत. एकूण ६ लाखांचे उत्पन्न मिळाले असून, दिवाळी व जादा बसेसने साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.