शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही लाखोंची ‘धुळवड’!

By admin | Updated: March 26, 2016 02:24 IST

रासायनिक रंगांना कमी पसंती; जलमुक्त होळीला प्राधान्य.

शिखरचंद बागरेचा/वाशिमधूलिवंदनाच्या दिवशी जिल्हावासियांनी पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य दिल्याचे बाजारपेठेतील आकडेवारीवरून दिसून येते. इको फ्रेन्डली रंग व अन्य साहित्याची १२ लाखांच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज असून, रासायनिक रंगांना ग्राहकांनी पसंती दिली नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. मागील तीन वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे सतत नापिकीला सामोर्‍या जाणार्‍या व यावर्षी दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या वाशिम जिल्हय़ातील शौकिनांनी होळी सणानिमित्त रंगात रंगून लाखोंची धुळवड केली. होळी सणाच्या दुसर्‍या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा पुरातन काळापासून सुरू आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होऊन आधुनिकतेची भर पडत आहे. विविध प्रकारच्या रंगांचा वापर करून प्रत्येक जण एकमेकाला रंग लावून ह्यहोळीह्ण साजरी करतो. यावर्षीही दुष्काळाच्या आगीत होरपळलेल्या वाशिम जिल्हय़ात रंगप्रेमींनी लाखो रुपयांचे रंग उधळून धुळवड साजरी केली. काही संघटना यासाठी अपवाद ठरल्या असून, या सामाजिक संघटनांनी जलमुक्त रंगपंचमी साजरी करून एक चांगला संदेश दिला. जिल्हय़ातील वाशिम, मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा या शहरांसोबत तालुक्यातील व्यावसायिकांनी विविध प्रकारचे रंग, रंग उडविणार्‍या पिचकार्‍या, आकर्षक व रंगीन टिपोर्‍या इत्यादी साहित्यांची तब्बल १२ लाख रुपयांची विक्री केली, असा प्राथमिक अंदाज व्यावसायिकांनी वर्तविला. रंगपंचमीच्या दिवशी जिल्हय़ात सर्वत्र रंग खेळणार्‍यांमध्ये युवा पिढी अग्रेसर होती. जिल्हय़ात दुष्काळी परिस्थिती व दुष्काळ वातावरणाचा रंगप्रेमी कुठल्याच प्रकारचा ताण डोक्यावर न घेता रंगपंचमीचा मात्र मनसोक्त आनंद घेतल्याचे दिसून आले. 'ड्रंक अँण्ड ड्राइव्ह'प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली.