शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

मेटॅडोरची विद्युत रोहित्राला धडक

By admin | Updated: July 13, 2015 02:09 IST

मानोरा येथील घटना; सुदैवाने मोठा विद्युत अपघात टळला.

मानोरा (जि. वाशिम) : मालवाहू मेटॅडोरने विद्युत रोहित्राला धडक दिल्याने जिवंत विद्युत तारा जमिनीलगत आल्या. सुदैवाने विद्युत पुरवठा तातडीने बंद केल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना शहरातील वसंतनगर मानोरा-दिग्रस मेन रोडवरील बाजार समितीच्याजवळ १२ जुलै रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या दरम्यान घडली. मानोरा येथील हलिमा ट्रेडिंग कंपनीचा एम.एच. ३७ बी - १५0१ क्रमांकाचा मेटॅडोर असून, विठोलीनजीक असलेल्या त्यांच्या कोहीनूर जिनिंग प्रेसिंग फॅ क्टरीमधून ढेप घेऊन शहरातील त्यांच्या हलिमा दुकानात आणत होते. चार किलोमीटर दूरवरून येत असताना, मानोरा-दिग्रस रस्त्यावर बाजार समितीजवळ मानोरा येथील विद्युत रोहित्राला या मेटॅडोरने जबर धडक दिली. मेटॅडोर उलटला असून, मेटॅडोरचे समोरचे पट्टे तुटले आहेत. वाहन चालकाला किरकोळ इजा झाली. अपघात घडल्यावर तो मेटॅडोरमधून बाहेर पडला. ज्या विद्युत रोहित्राला जबर धडक बसली, त्यावेळी विद्युत प्रवाह सुरू होता. विद्युत तारा तुटून पडल्या; मात्र वीजपुरवठा बंद केल्याने संभाव्य अनर्थ टळला.