वाशिम - भविष्यात उदभवणारी पाणीटंचाईची दाहकता तसेच मुलींचा जन्मदर वाढविण्याची गरज पथनाट्याव्दारे सादर करुन वाशिम येथील नॅझरीन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी शनिवारी सायंकाळी विविध कला सादर केली. सुरकंडी येथे जागृती सेवा केंद्र व ग्रामस्थांच्या वतीने ह्यवार्म मिशनह्ण अंतर्गत समारोपीय कार्यक्रमात विद्याथीर्नींनी आपल्या कलेचा अविष्कार घडविला. जागृती सेवा केंद्राच्यावतीने पंचाळा गट ग्रामपंचायत मधील पंचाळा, सुरकंडी खुर्द, सुरकंडी बु, मोहगव्हाण या गावांमध्ये पाणी वाचवा, मुलगी वाचवा, शेती व शेतकरी कसा समृध्द होईल याबाबत वार्म मिशन राबविले गेले. या मिशनचा समारोपीय कार्यक्रम सुरकंडी येथे पार पडला. यावेळी नॅझरीन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी विविध प्रकारचे पथनाट्य सादर करुन भविष्यात पाणीटंचाई किती उग्र रुप धारण करु शकते याची प्रचिती गावकऱ्यांसमोर मांडली. तसेच मुलींना वाचविण्याची गरज नाटकाव्दारे सादर करुन ह्यलेक वाचवाह्णचा संदेश दिला.
पथनाट्यातून ‘पाणी बचत व बेटी बचाओ’चा संदेश !
By admin | Updated: March 26, 2017 13:33 IST