शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘मेमो बुक’ प्रकरण विधानसभेत गाजणार

By admin | Updated: November 23, 2015 00:58 IST

लोकमत वृत्ताची दखल, राजेंद्र पाटणी शासनाला विचारणार जाब.

वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यासाठी वाहतूक विभाग वापरत असलेली मेमो बुकची पुस्तके अनाधिकृत असल्याची गंभीर बाब 'लोकमत'ने १६ नोव्हेंबर रोजी उघडकीस आणली. या वृत्ताची आमदार राजेंद्र पाटणी यांनी दखल घेतली असून, येणार्‍या हिवाळी अधिवेशनामध्ये यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाहनचालकांची फसवणूक किंवा अवैध वसुली सहज शक्य असल्याची बाब 'लोकमत'ने १५ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड केल्याने एकच खळबळ उडाली. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा गेल्या अनेक वर्षांंपासून वाहनधारकांकडून आकारण्यात येणारे तडजोड शुल्क एका साध्या मेमो बुकच्या पावतीचा आधार घेऊन जमा करीत आहे. गृह मंत्रालयाने ठरवून दिलेल्या अधिकृत जीएन (दंड वसुलीची छापील पावती) पुस्तकाचा वापर न करण्यामागे बरेच 'अर्थकारण' दडल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणार्‍या वाहनचालकांकडून तडजोड शुल्क (दंड) आकारण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या जीएन पुस्तकांचा किंवा पोलीस अधीक्षकांनी प्रमाणित केलेल्या पुस्तकांचाच वापर करणे अधिकृत समजले जाते. या प्रकरणाची दखल आमदार राजेंद्र पाटणी यांनी घेतली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, याकरिता ही बाब आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती आ. राजेंद्र पाटणी यांनी दिली आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.