शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: July 16, 2017 02:14 IST

राजुरा ग्रामपंचायत : जात वैधता सादर न करणे भोवले!

लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा : मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने राजुरा ग्रामपंचायतच्या उपसरपंचासह चार सदस्यांचे सदस्यत्व विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश प्राप्त झाले असून, १५ जुलै रोजी संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत सचिव संजयराव घुगे यांनी दिली. मालेगाव पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या राजुरा ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी पुढील सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. असे असताना राजुरा ग्रामपंचायत सदस्य संजीवनी घुगे, दुर्गाबाई पुरुषोत्तम, संगीता अढाव, वसंता उत्तमराव कांबळे या चारही सदस्यांनी दिलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. परिणामी, संबंधितांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी, वाशिम यांनी ११ एप्रिल २0१७ रोजी दिला होता. त्याविरोधात वसंता कांबळे व दुर्गाबाई पुरुषोत्तम या दोन सदस्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले होते. मात्र, आयुक्तांनी अपर जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवत चारही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले. यासंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचा आदेश मालेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांनी सचिव, ग्रामपंचायत राजुरा यांना १३ जुलै रोजी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांमध्ये वार्ड क्र.१ व वार्ड क्र.२ मधील प्रत्येकी एक; तर वार्ड क्रमांक ३ मधील दोन सदस्यांचा समावेश असून, या निर्णयाने विद्यमान उपसरपंचही अपात्र ठरले आहेत. या निकालाने नऊ सदस्यसंख्या असलेल्या राजुरा ग्रामपंचायतमधील चार सदस्य अपात्र ठरल्याने राजुरा येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, याबाबत ग्रामस्थांमध्ये खमंग चर्चा होत आहे.