शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा गाजली

By admin | Updated: September 10, 2015 02:15 IST

निकृष्ट पाइप खरेदी मुद्या गाजला; सभेत अधिका-यांच्या अनुपस्थितीवर सदस्य आक्रमक.

वाशिम : जिल्हा परिषदेच्या कृषी व समाजकल्याण विभागांतर्गत खरेदी करण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करून सभेत अधिकार्‍यांची अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त करीत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले. यावेळी डीपीडीसीकडे प्रलंबित असलेला निधी व नरेगा अंतर्गत सिंचन विहिरीसह अनेक विषयांवर सभा गाजली. स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात पार पडलेल्या स्थायी सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद, सभापती ज्योतीताई गणेशपुरे व सुभाष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेच्या सुरुवातीलाच विविध खात्याचे अधिकारी हजर नसल्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सुमारे अर्धा ते पाउणतास या विषयावर चर्चा झाल्यानंतर कृषी व समाजकल्याण विभागामार्फत खरेदी करण्यात आलेले पाइप निकृष्ट दर्जाचे असल्याचा मुद्दा तसेच डीपीडीसीकडील प्रलंबित निधी व नरेगा सिंचन विहीर योजनेतून रिसोड व मंगरुळपीरला वगळण्याचा मुद्दा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे व विकास गवळी यांनी उचलून धरला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य आक्रमक झाले होते. यासह विविध प्रश्नांवर स्थायी समिती सभा गाजली. अनेक दिवसांनंतर स्थायी समिती सभेत विविध विषयांवर चर्चा दिसून आली.