शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारी गुंतले स्वत:च्या व्यवसायात!

By admin | Updated: July 4, 2017 19:37 IST

कार्यरत डॉक्टरांचीही कर्तव्याला "दांडी" : जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केलेल्या अनेक डॉक्टरांनी सद्य:स्थितीत स्वत:चे टोलेजंग हॉस्पिटल उभे करून खासगीत वैद्यकीय व्यवसाय थाटला आहे. याशिवाय कार्यरत १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांमधूनही अनेकांकडून अधूनमधून कर्तव्याला ह्यदांडीह्ण मारण्याचा प्रकार वाढीस लागल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉ. विजय कानडे हे १८ आॅगस्ट १९९५ ला रुजू झाले, ते २००९ पासून गैरहजर आहेत. डॉ. शिवाजी सावळे हे देखील १६ सप्टेंबर २००६ पासून गैरहजर आहेत. डॉ. संतोष सारडा यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली असून डॉ. गणेश कानडे हे १ नोव्हेंबर २०१३ पासून गैरहजर आहेत. डॉ. लिना राठोड यांनी १ मार्च २०१४ रोजी राजीनामा दिला, डॉ. कविता ठाकरे ह्या ४ मार्च २०१५ पासून गैरहजर आहेत. डॉ. मानाजी घुगे, डॉ. विद्या भरणे हे देखील नियुक्तीपासूनच गैरहजर आहेत. डॉ. राम बाजड, डॉ. कुणाल काळे यांनी राजीनामा दिला; तर डॉ. चंद्रकांत तम्मेवार, डॉ. आशिष बेदरकर, डॉ. मंजुषा आढाव, डॉ. शेख हुसून शेख, डॉ. स्नेहा बिल्लारी, डॉ. व्ही.एस.ढगे हे वैद्यकीय अधिकारी कुठलेही ठोस कारण न देता गैरहजर आहेत. तथापि, मंजूर ३० पदांपैकी १६ वैद्यकीय अधिकारी आपल्या खासगी व्यवसायात गुंतले असून इतर १४ वैद्यकीय अधिकारी देखील सलग सेवा देण्याकामी कुचराई करित असल्याने अतिदक्षता विभाग, शुश्रृषा कक्ष, ट्रामा केअर युनिट, सी.टी.स्कॅन, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आदी सर्व घटकांवर परिणाम होत असून रुग्णसेवा देखील प्रभावित होत आहे. कुठलेही ठोस कारण न दर्शविता गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे रुग्णसेवेवर विपरित परिणाम जाणवत आहे. संदर्भातील सविस्तर अहवाल वेळोवेळी शासनाकडे सादर करण्यात आला असून रिक्त असलेली पदे भरण्याबाबत शासनाचे देखील निर्देश आहेत. त्यावर लवकरच कार्यवाही केली जाईल. - डॉ.एन.बी.पटेलजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम