शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील शहीद स्मारकांची अवहेलना कायमच !

By admin | Updated: August 9, 2014 01:17 IST

वाशिम जिल्ह्यातील शहीद स्मारकांकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.

वाशिम : केवळ स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, क्रांती दिन अथवा इतर राष्ट्रीय सणांच्या दिवशी देशभक्तींचा आव आणणारी जनता व प्रशासनाला प्रत्यक्षात मात्र स्वातंत्र्य व स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍यां भारतमातेच्या सुपुत्रांविषयी फारसा आदर आहे असे वाटत नाही. जिल्ह्यातील दुर्लक्षित असलेले शहीद स्तंभ, शहीद स्मारक, हुतात्मा स्मारक व जयस्तंभ आदींनी ही बाब अधोरेखित केली आहे. सदर स्मारकांची आजमितीला कमालीची दुरवस्था झालेली आहे. काही स्मारकांना गवताच्या साम्राज्याने वेढले, तर काहींची पडझड झाली. काही स्मारकांना घाणीने आपल्या कवेत घेतले तर काही स्मारकांचा रंग उडाला आहे. शिरपूर : देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी जिवाचे रान करून देश स्वातंत्र्य करून दिला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधण्यात शिरपूर येथील स्वातंत्र्य सेनानी स्मारक पार दुर्लक्षित असून, याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने एकप्रकारे या स्मारकाची थट्टा चालविली आहे. आजही १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे रोजी या भागाची स्वच्छता करून स्वातंत्र्यासाठी झटणार्‍यांना मानवंदना देऊन झेंडावंदन केल्या जात आहे. या दिवसांनंतर मात्र याकडे कुणीही फिरकून पाहताना दिसून येत नाही. या स्मारकाच्या दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतने दोन वर्षाआधी ठरावसुद्धा घेतला होता तो ही कागदावरच आहे.वाशिम जिल्हय़ातील जैनाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे १९६0 मध्ये स्वातंत्र्य सेनानी स्मारक उभारण्यात आले होते. स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे स्मारक त्यावेळच्या ग्रामपंचायत प्रशासनाने उभारून येथे सभा, सामाजिक कार्यक्रम येथे असलेल्या स्मारकानजिक ओट्यावर व्हायचे. त्यावेळी शिरपूर येथे असलेले स्वातंत्र्य सैनिक आनंदराव मनाटकर, विश्णाजी पौळकर, निळकर व देशमुख यांनी स्वातंत्र्य सैनिक शिवनारायण शर्मा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारकासाठी पुढाकार घेतला होता. या स्मारकाजवळ वर्षानुवष्रे विविध कार्यक्रम पार पडले. गत काही वर्षांपासून या स्मारकाची अतिशय दुर्दशा होऊन सर्व पडझड झाली आहे. ठराव कागदावरच असल्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या सेनानीचे स्मारक आजही दुर्लक्षितच आहे.