शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितांचा छळ; १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:17 IST

तीन वेगवेगळ्या घटना : पैशांच्या मागणीवरून मानसिक त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा/रिसोड : माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीवरून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना मानोरा आणि रिसोड तालुक्यात घडल्या आहेत. याप्रकरणी मानोरा आणि रिसोड पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी १९ जुलै रोजी एकंदरीत १७ आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. यातील पहिली घटना गिरोली येथील असून, फिर्यादी महिला विमल पांडुरंग अंभोरे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती पांडुरंग श्रीराम अंभोरे, दीर महादेव श्रीराम अंभोरे, मनोज श्रीराम अंभोरे, कविता महादेव अंभोरे, सखाराम पवने, तुळसाबाई सखाराम पवणे (सर्व रा.गिरोली) यांनी माहेरवरून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला व जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम ४९८ ‘अ’, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या घटनेत प्रिया सदाशिव सरोदे या महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तिचा पती सदाशिव सरोदे, सासरे अजाबराव सरोदे, सासू प्रमिला सरोदे (सर्व रा.मांडवा, ता. दिग्रस, जि.यवतमाळ) यांनी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याकरिता तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी मानोरा पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम ४९८ ‘अ’, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास बिट जमादार प्रकाश भगत, गणेश कुरकुरे करीत आहेत. विवाहितेच्या छळाची तिसरी घटना रिसोड तालुक्यातील असून, तू दिसायला सुंदर नाही, मनासारखा हुंडा दिला नाही व किराणा दुकान उभारण्यासाठी ५० हजार रुपये आणण्याच्या मागणीसाठी सासरच्या मंडळींनी मानसिक, शारीरिक छळ केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पार्वतीबाई बावरे या महिलेने रिसोड पोलिसांत दाखल केली. त्यावरून आसेगाव पेन येथील फिर्यादीचा पती हरिभाऊ बावरे, सासू राधा बावरे, सासरा भगवान बावरे, ननंद आशा कांबळे, सुनीता बांगरे, सुभाष कांबळे, भिकाजी बांगरे आदींविरुद्ध भादंविचे कलम ४९८, ५०४, ५०६ , ३४ ‘अ’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.