शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी सासरच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हे!

By admin | Updated: June 13, 2017 01:20 IST

मालेगाव येथील प्रकरण : पाच लाख रुपयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: नोकरीसाठी माहेरवरून पाच लाख रुपये आणण्यासाठी पती व सासरकडील मंडळींनी छळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विवाहितेने दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव पोलिसांनी तिच्या सासरकडील नऊ जणांविरुद्ध सोमवारी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. मालेगाव येथील मुंगसाजीनगरमध्ये माहेर असलेली अंकिता श्रीकृष्ण भेणे (वय २७ वर्षे) हिचे सासर हडको, नांदेड येथे आहे. अंकिताने मालेगाव पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे, की तिच्या सासरकडील मंडळी व पतीने नोकरीसाठी माहेरवरून पाच लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. सतत मारहाण केली. अंकिताला एक वर्षाची मुलगी असून, ती सध्या सासरच्या त्रासामुळे मालेगाव येथे तिच्या वडिलांकडे वास्तव्याला आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांना अजून दोन अविवाहित मुली आहेत. अंकिताचे डीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, वडिलांनी आपल्या इतर दोन मुलींनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी धडपड चालविली आहे. अशा परिस्थितीमध्ये अंकिताच्या सासरच्या मंडळीची तिला होणारी मारहाण व छळामुळे हे कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते. अखेर सासरच्या जाचाला कंटाळून अंकिताने मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तिचा पती श्रीकृष्ण भेणे, सासरे सुभाष भेणे, सासू, नणंद तसेच तिचा पती अशा एकूण नऊ जणांविरुद्ध कलम ४९८, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ गजानन वाणी करीत आहेत.