शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वाशिमात मोर्चा

By दिनेश पठाडे | Updated: July 26, 2023 15:10 IST

शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

वाशिम : मणिपूर राज्यातील  महिला अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी वाशिम शहरात समविचारी संघटनांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. समनक जनता पार्टी, गोरसेना, गोरसीकवाडी जिल्हा वाशिम, नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा  निर्मुलन समिती, वाशिम आदी समविचारी संघटनाच्या वतीने २६ जुलैला धिकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव स्मारक परिसरातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी मणिपूर व केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मणिपूरमध्ये अत्याचार करणाऱ्यांना व महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुन्हेगारांना तेथील सरकारने शासन न केल्यामुळे गुन्हेगारांचे धैर्य वाढले आहे.

केंद्र व राज्य सरकारचा निषेध करतानाच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, दोषींना कडक शिक्षा द्यावी, मणिपूर मधील घटनेने देशाची जगात नाचक्की झाली आहे. त्यामुळे या घटनांची गांभीर्याने नोंद घेऊन निःपक्षपाती कारवाई करुन गुन्हेगाराना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले.  यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होतो.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार