शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या इमारती बदलण्याची हालचाल

By admin | Updated: June 28, 2016 02:42 IST

सामाजिक न्याय विभागाने काढली सूचना; ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल.

वाशिम : कारंजा आणि वाशिम येथे चालविल्या जाणार्‍या भाड्याच्या इमारतींमधील शासकीय वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याबाबतचे प्रकरण ह्यलोकमतह्णने उचलून धरले. त्याची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्याने सामाजिक न्याय विभाग चांगलाच हादरला असून, दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याची हालचाल सध्या जोरात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत वाशिम शहरात अनंत व्यंकटराव मुसळे यांच्या मालकीच्या इमारतीत वसतिगृह चालविले जाते. दरमहा २७ हजार ३५0 रुपये भाडे असलेली ही इमारत मात्र ७६ विद्यार्थ्यांच्या तुलनेत अगदीच अपुरी पडत असून, इतर सुविधांनाही याठिकाणी सपशेल कोलदांडा देण्यात आला. पलंग, गाद्यांची दुरवस्था होण्यासोबतच गेल्या अनेक वर्षांपासून इमारतींमधील खोल्यांची रंगरंगोटी झालेली नाही. परिणामी, वसतिगृहात वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. जिल्ह्यातील कारंजा येथे दरमहा १७ हजार रुपये भाडे असलेल्या वसतिगृहाच्या इमारतीतही विद्यार्थ्यांना अपेक्षित सुविधा मिळत नाहीत. यासंदर्भात लोकमतने २३ जूनच्या अंकात स्टिंग ऑपरेशन प्रकाशित करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. त्याची सामाजिक न्याय विभागाचे अमरावती येथील उपसंचालक आणि वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तडकाफडकी दखल घेऊन याप्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांना दिले. दरम्यान, विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्यास अपयशी ठरलेल्या दोन्ही ठिकाणच्या इमारती बदलण्याचा निर्णय झाला असून, यासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने २७ जून रोजी वाशिम आणि कारंजा येथे वसतिगृहांकरिता सर्व सुविधांयुक्त इमारती भाडेतत्त्वावर मिळण्याबाबत सूचना काढली आहे. केवळ 'लोकमत'च्या सलगच्या पाठपुराव्यामुळे वसतिगृहाच्या इमारती बदलण्याचा हा प्रश्न मार्गी लागल्याने जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.