शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बसेस दुरुस्तीसाठी विभागीय कार्यशाळेतून मनुष्यबळ

By admin | Updated: July 15, 2015 01:41 IST

प्रभाव लोकमतचा; प्रादेशीक व्यवस्थापक एम. बी. पठारे यांच्या पथकाची वाशिम आगाराला भेट.

वाशिम -येथील आगारातील नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी यापुढे विभागीय कार्यशाळेतून साहित्यासह मनुष्यबळ पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशीक व्यवस्थापक पठारे यांनी १३ जुलै रोजी आगाराच्या भेट दरम्यान दिले. आगार प्रमुख एन.डी.चव्हाण यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे. दै. लोकमतने रविवारी १२ जुलै रोजी वाशिम आगारातील १२ बसगाडया नादुरुस्त या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल घेवून प्रादेशीक व्यवस्थापक पठारे यांच्या पथकाने वाशिम आगाराला १३ जुलै रोजी तातडीची भेट देवून येथील समस्या जाणून घेतल्याचे चव्हाण यांनी लोकमतशी बोलता सांगितले. दरम्यान आगातील बसगाड्यांची नियमित सव्हीर्संंंगही करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगारातील १२ बसगाडया नादुरुस्त होवून डेपोत जमा झाल्यामुळे चंद्रपूर, औंरगाबाद, नागपूर आदी लांब पल्याच्या फेर्‍या बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना हाल सोसावे लागत आहे. याशिवाय आगारातील अन्य असुविधां व भोंगळ कारभार लोकमतने चव्हाटयावर आणल्यामुळे प्रादेशीक व्यवस् थापक एम. बी. पठारे यांनी विभाग नियंत्रक अजय सोली, (अकोला) व सहाय्यक यंत्र अभियंता जोशी अकोला यांच्या समवेत वाशिम येथे आगारात भेट देवून तेथील समस्या जाणून घेतल्या. यावेळी पठारे यांनी आगारात रिक्त असलेल्या यांत्रीक कर्मचार्‍यांच्या जागी नविन कर्मचार्‍यांची नियुक्ती लवकरच करण्यात येवून २२ यांत्रिक कर्मचार्‍यांना पदोन्नती देवून त्याची कुशल कामगार म्हणून नेमणुक करणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच नादुरुस्त बसेस दुरुस्त करण्यासाठी विभागीय कार्यशाळेतून मनुष्यबळ व साहित्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही चव्हाण यांनी बोलताना दिली. त्यामुळे वाशिम आगाराच्या समस्या निकाली निघून येथील सुविधांचा दर्जा वाढणार आहे. परिणामी आता प्रवाशांना चांगल्या बसद्वारे प्रवास करण्यास मिळेल.