शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा ग्रामीण रुग्णालयास रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: July 17, 2017 02:31 IST

रुग्णांची गैरसोय: अधीक्षकांसह आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या मानोरा ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. त्यातच इतर सोयीसुविधांचाही अभाव असल्यामुळे रुग्णावर जुजबी प्राथमिक उपचार करुन रेफर करण्यापलिकडे येथे कार्यरत अधिकाऱ्यांना नाईलाजास्तव करावे लागत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रिक्त पदांचा तिढा सोडवावा अशी मागणी होत आहे.तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असल्यामुळे साधारण आजारांवर उपचार घेणाऱ्या गोरगरीब रुग्णांसह अनेक गंभीर स्वरुपाचे रुग्ण येथे येतात, परंतु ग्रामीण रुग्णालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. आवश्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे अनेक रुग्णांना आल्यापावली परत जावे लागत आहे. या रुग्णालयातील अतिशय महत्वाचे वैद्यकीय अधिक्षक हे पद अनेक वर्षापासून रिक्त असून, या पदाचा प्रभार वैद्यकीय अधिकारी महेश राठोड सांभाळतात त्यासोबतच वैद्यकीय अधिकाऱ्यांंची दोन पदेही रिक्त आहेत. त्यामुळे इतर ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना येथे येऊन उपचार करावे लागतात. रुग्णालयातील असंसर्गजन्य व्याधी विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद रिक्त असून, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची चार पदे रिक्त आहेत. त्यातही यामधील महिला वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे शाळांमधील मुलीची तपासणी करणे अशक्य झाले आहे. असंसर्गजन्य व्याधी विभागातील महत्वाचे पद रिक्त असल्यामुळे मधुमेह रक्तदाब , कर्करोग , मूत्रपिंडाचे आजार आदिंवर उपचार होत नाहीत. परिणामी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना इतर ठिकाणी ‘रेफर’ करण्यापलिकडे येथे पर्यायही उरलेला नाही. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून क्ष-किरण तपासणी तंत्रज्ञ नसल्यामुळे येथील क्ष-किरण तपासणी यंत्रही धूळखात पडले आहे.