शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मानोरा नगर पंचायतचा ११ कोटींचा निधी धूळ खात!

By admin | Updated: March 4, 2017 01:52 IST

विकासात्मक कामे ठप्प असल्याचा नगराध्यक्ष रेखा पाचडे यांचा आरोप.

वाशिम, दि. ३- मानोरा शहर विकासासाठी शासनाकडून ११ कोटींचा भरघोस निधी प्राप्त असूनही, केवळ जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी मिळत नसल्याने विकासात्मक कामे ठप्प असल्याचा आरोप नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी निवेदनाद्वारे केला.नवनिर्मित नगर पंचायतींचा विकास करण्यासाठी शासनाकडून निधी पुरविला जात आहे. विविध योजनेंतर्गत मानोरा नगर पंचायतला कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. या निधीतून शहराचा विकास साधला जाईल, अशी अपेक्षा मानोरावासीयांना होती. मात्र, अद्यापही मंजुरी मिळाली नसल्याने आणि ३१ मार्च डोळ्यासमोर असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. वैशिष्ट्येपूर्ण योजनेतून तीन कोटी, विशेष रस्ता अनुदान योजनेतून दोन कोटी, नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय योजनेंतर्गत सहा कोटी, रस्ता अनुदान निधीमधून २0 लाख असा एकंदरित ११ कोटी २0 लाख रुपयांचा निधी मानोरा नगर पंचायतला मिळाला आहे. या निधीतून कामे सुरू होण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी आवश्यक आहे. मात्र, अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने शहर विकासापासून कोसो दूर असल्याचे नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी निवेदनात नमूद केले. शहर विकास कामांचे नियोजन करण्याचे उद्देशाने नगर पंचायतचे ठराव मंजूर आहेत, असे असतानाही केवळ राजकीय कुरघोडी म्हणून मानोरा शहराचा विकास रोखला जात आहे, असा घणाघाती आरोपही पाचडे यांनी केला. शासन निर्णयानुसार, नगर पंचायत व नगर परिषदेला योजनेंतर्गत वितरण करण्यात आलेल्या निधिकरिता स्वतंत्र बँक खाते असावे, या बँक खात्यात निधी ठेवण्यात यावा, असे नियम सांगतो. मात्र, अद्यापही मानोरा नगर पंचायतच्या स्वतंत्र बँक खात्यात कोट्यवधींचा हा निधी का ठेवण्यात आला नाही, या निधीचे व्याज कुणाच्या फायद्याचे? असा प्रश्नही नगराध्यक्ष रेखा पाचडे यांनी उपस्थित केला. बँक खात्यात निधी नसल्याने तांत्रिक मंजुरीसाठी एक टक्का याप्रमाणे ११ लाख रुपये नगर पंचायत कोठून भरणार? असा सवालही पाचडे यांनी उपस्थित केला. राजकीय दबावातून मंजुरी मिळत नसेल, तर न्यायोचित मागणीसाठी न्यायालयात जाण्याचा इशाराही नगराध्यक्ष पाचडे यांनी दिला आहे.