मंगरूळपीर : येथील वीज वितरणच्या कार्यालयाकडे नगर परिषदेचा १0 लाख ९७ हजार ५७९ रुपये कर थकीत आहे. दरम्यान, ३१ मार्च रोजी नगर परिषदेने या कार्यालयावर धडक देऊन सील ठोकण्याचा पवित्रा अंगिकारला; मात्र यावेळी तडजोड होऊन येत्या ५ १ दिवसांत कर अदा करण्याचे ठरले. त्यामुळे ही कारवाई तूर्तास स्थगित करण्यात आली.वीज वितरण कार्यालयाने पूर्वीच्या थकबाकीसह १ एप्रिल २0१६ पासून ३१ मार्च २0१७ पर्यंंतचा कर अदा केला नाही. ती रक्कम आजमितीस १0 लाख ९७ हजार ५७0 रुपये झाली आहे. तथापि, येत्या पाच दिवसांत कराची रक्कम अदा न केल्यास उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, ३३ केव्ही वीज उपकेंद्रातील सर्व साहित्य जप्त करण्यात येईल, असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामुळे वीज वितरण विभागाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
मंगरूळपीर वीज विभागाकडे १0 लाखांचा कर थकीत!
By admin | Updated: April 1, 2017 02:34 IST