साहेबराव राठोड /मंगरुळपीर
यंदाच्या अत्यल्प पावसामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असुन प्रशासनाने नुकतेच जाहीर केलेल्या सुधारीत आणेवारी ४६ पैसे आहे. आणेवारी ५0 पैसे पेश्यापेक्षा कमी असल्याने तालुका दुष्काळ घोषीत करावे अशी मागणी दुष्काळात होरपळणार्या शेतकर्यांनी केली आहे. यावर्षी तालुक्यात सुरूवाती पासुनच पावसाची सरासरी अत्यंत कमी आहे.मृग नक्षत्र कोरडा गेल्या नंतर उशीरा पेरण्या झाल्या होत्या त्यानंतरही वरूणराजानी डोळे वटारल्याने शेतकर्यांवर दुबार तिबार पेरण्या करण्याचा प्रसंग ओढावला होता शासनाकडुन दुबार पेरणीची मदत मिळाली नाही.आधी बॅकेचे कर्ज त्यानंतर सावकारा कडुन कर्ज घेवुन शेतकर्यांनी पेरण्या पुर्ण केल्या तरी देखील निर्सगाने साथ दिली नाही ऐन गरजेच्या वेळी वरूण राजांनी पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या मुख्य सोयाबीन पिकाच्या उत्पादनात प्रचंड इतकी घट पाहावयास मिळाली.यंदाचा खरीप हंगाम शेतकर्यांसाठी शापीत ठरला आहे.तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रब्बी हंगाम सुध्दा कोरडा जाण्याची शक्यता व र्तविण्यात येत आहे.विहीरीची तसेच बोअरवेलच्या पाण्याच्या पातळी कमालीची खालावल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शिवाय दरवर्षी रब्बी हंगामाला शे तकर्यांना हातभार लावणारे लहान मोठे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे त.खरीप हंगामाच्या उत्पादनावर परिणाम तर झालाच त्याच बरोबर तालुक्यावर जलसंकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.जिल्हय़ातील दोन तालुके वगळता इतर तालुके आघाडी शासनाने दुष्काळ घोषीत केले होते.मात्र त्यावेळी मंगरूळपीर तालुक्याची परिस्थीती गंभीर असतांनाही दुष्काळाच्या यादीतुन वगळण्यात आले होते.आता या तालुक्याची सुधारीत आणेवारी ४६ पैसे असल्याने शासनाने विनाविलंब तालुक्याला दुष्काळ घोषीत करा अशी मागणी आर्थीक विवंचनेत सा पडलेल्या शेतकर्यांनी केली आहे. महसुल विभागाच्या वतीने सुधारीत आणेवारी ४६ पैसे इतकी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली पुढील अंतिम आणेवारी ही १५ जानेवारीला जाहीर होणार आहे.त्यानंतरच शासनाकडुन दुष्काळ घोषीत करण्याचा निर्णय होऊ शके ल, असे मंगरूळपीरचे नायब तससिलदार विजय साळवे यांनी लोकमत प्र ितनिधीशी बोलताना स्पष्ट केले.