शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांनी मालेगावकर त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव शहरातील काही भागात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्या सोडविण्याची मागणी वाझुळकर मित्र मंडळाच्यावतीने ३१ जुलै रोजी नगर पंचायतच्या मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनानुसार, मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजारापेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येसाठी आवश्यक तेवढा पाणीपुरवठा व्हावा, याकरिता पाणीपुरवठा योजनेचा ...

ठळक मुद्देवाझुळकर मित्र मंडळातर्फे निवेदनगैरसोय टाळण्याची मागणीनगर पंचायतच्या मुख्याधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव शहरातील काही भागात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. सदर समस्या सोडविण्याची मागणी वाझुळकर मित्र मंडळाच्यावतीने ३१ जुलै रोजी नगर पंचायतच्या मुख्याधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनानुसार, मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजारापेक्षा जास्त आहे. या लोकसंख्येसाठी आवश्यक तेवढा पाणीपुरवठा व्हावा, याकरिता पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ असणे आवश्यक आहे; मात्र अद्याप शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचा जलकुंभ नाही. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, नव्याने जलकुंभ निर्माण करण्याची मागणी वाझुळकर मित्र मंडळाने केली. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करणे गरजेचे ठरत आहे. आठवडी बाजारातून तहसीलदार कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. एका ठिकाणी तर खोलवर खड्डा पडला असून, गज उघडे पडले आहेत, त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याची दुरुस्ती करावी, तसेच शहरालगतच्या नवीन वस्तीमध्ये नाल्या, वीज, या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.निवेदनावर मित्र मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, कार्याध्यक्ष हारूण शाह, सरचिटणीस गजानन कव्हर, उपाध्यक्ष वसंतराव लव्हाळे, वसंतराव देशमुख, भानुदास नवघरे, शहराध्यक्ष पांडुरंग नानोटे, पी.जी. लांडकर, बंडू गुडदे, शिवाजी ताकतोडे, भगवान साळवे, विश्वनाथ लहाने, दीपक घोडके, गणेश अहिर, कृष्णा गायकवाड, संजय आमले, ग्रामीण साहित्यिक उद्धवराव वाझुळकर आदींच्या सह्या आहेत.चाकातीर्थ लघु पाटबंधारे योजनेच्या तलावावरून ३४ कोटी अंदाजित खर्चाची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. आठवडी बाजारातून तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आलेल्या २.२५ कोटीच्या निधीतून होणार आहे.-गणेश पांडे, मुख्याधिकारी, नगर पंचायत मालेगाव.