शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावकरांनी स्वयंस्फुर्तीने पाळला बाजारपेठ बंद

By admin | Updated: August 18, 2016 00:42 IST

व्यापा-यांनी बंद ठेवली प्रतिष्ठाने; पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी.

मालेगाव, (जि. वाशिम), दि. १७ : शहरात गत आठवडयापासून सशस्त्र दरोडेखोरांनी हैदोस घातल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. या दहशतीमुळे शहरवासी भयभयीत झाल्याने तसेच स्थानिक पोलिस प्रशासनाकडून अद्यापपर्यंंंत कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नसल्याने शहरातील नागरिकांच्यावतीने बुधवारी मालेगाव शहर बंदची हाक दिली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने १00 टक्के कडकडीत बंद पाळला.गत आठवड्यापासून शहरात दरोडेखोर व चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांचा तगडा पहारा आणि नागरिकांची सतर्कता असतानाही दरोडेखोर व चोरट्यांनी हैदोस घातल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले. चोरट्यांच्या दहशतीखाली वावरणार्‍या नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सर्वांंंनी सतर्कता बाळगावी याबाबत जनजागृती म्हणून बुधवारी मालेगाव बंदची हाक दिली होती. यासंदर्भात १६ ऑगस्ट रोजी मालेगाव तहसिलदारांना निवेदन दिले होते. बुधवारी सर्व व्यापारी व इतर व्यावसायीकांनी बंदला १00 टक्के प्रतिसाद देत स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद ठेवली.स्थानिक तहसिल परिसर, शेलुफाटा, लहुजी पुतळा परिसर, पंचायत समितीमधील कॉम्प्लेक्स परिसर, मेनरोडमधील बाजारपेठ, आठवडी बाजार, सिव्हील लाईन, अकोला फाटा, गांधीचौक, मेडीकल चौक, जुने बसस्टँड आदी परिसरातील दुकाने कडकडीत बंद करुन पोलिस प्रशासनाच्या कार्यप्रणालीविषयी रोष व्यक्त केला.