शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

मालेगाव येथे भरदिवसा अडीच लाखांची चोरी

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला.

मालेगाव (वाशिम) : येथील रामनगरमध्ये राहत असलेले जगदीश सोनोने यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी ११ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. जगदीश सोनोने हे माणका येथे जि.प. शिक्षक आहेत. ते ११ फेब्रुवारी रोजी धुळे येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्यांची पत्नी भारती जगदीश सोनोने ११ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घराला कुलूप लावून जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपल्या लहान मुलासोबत गेल्या. मोठा मुलगा शाळेत गेला होता. बँकेचे काम आटोपून गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त असलेल्या महाप्रसादासाठी त्या गेल्या. त्यानंतर ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी परत गेल्या तेंव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले.त्यानंतर घरामध्ये गेल्या असता घरातील लाकडी कपाटसुद्धा उघडे दिसले. त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची खात्री पटली. त्यांनी कपाट उघडून बघितले असता कपाटातील सोन्याची मोठी गोफ ४५ ग्रॅम, सोन्याच्या बांगडया ३0 ग्रॅम, मंगळसूत्र ५ ग्रॅम, सोन्याची लहान अंगठी १ ग्रॅम, नेकलेस ११ ग्रॅम, सोन्याचा ओम २ ग्रॅम, असे एकूण १0२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्याची किंमत २ लाख ५५ हजार रुपये इतकी आहे. तसेच नगदी रोख १ हजार रुपये असा एकूण २ लाख ५६ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी चोरून नेला. या घटनेची फिर्याद भारती सोनोने यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम ४५४, ३८0 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे .