शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मका, ज्वारीच्या वितरणात अडकले पूर्वीचेही रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:48 IST

वाशिम : शासनाने रास्त दर धान्य दुकानांमधून मका व ज्वारीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला; परंतु नियमानुसार वितरणासाठी या धान्याचा ...

वाशिम : शासनाने रास्त दर धान्य दुकानांमधून मका व ज्वारीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला; परंतु नियमानुसार वितरणासाठी या धान्याचा पॉस मशीनवर समावेशच केला नाही. त्यामुळे या धान्याचे वितरण करणे दुकानदारांना अशक्य आहे. त्यातच अनेक दुकानांमध्ये अद्याप मका, ज्वारीच पोहोचलेली नाही. त्यामुळे अर्धा महिना उलटला तरी पूर्वीचे रेशनही शिधापत्रिकाधारकांना मिळू शकले नाही.

दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच निराधार, गोरगरीब लाभार्थ्यांना सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशनमधील स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. जिल्ह्यात २ लाख ७८ हजार १५० शिधापत्रिका असून, अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी लाभार्थ्यांना गहू व तांदळाचा लाभ दिला जातो. त्यात जानेवारी महिन्यापर्यंत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी २ रुपये प्रतिकिलो दराने ३ किलो गहू व ३ रुपये प्रतिकिलो दराने २ किलो तांदूळ, तसेच अंत्योदय कार्डधारकांना प्रतिकार्ड २ रुपये किलोप्रमाणे १५ किलो गहू व ३ रुपये किलोप्रमाणे २० किलो तांदूळ वितरीत केला जातो. आता मात्र शासनाने प्राधान्य कुटुंब तसेच अंत्योदय योजनेच्या २.३० लाख शिधापत्रिकाधारकांना रेशनवर मका देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वीच्या रेशन धान्यातील गव्हाच्या वितरणाचे प्रमाण ५० टक्के कमी करून ४० टक्के मका व १० टक्के ज्वारी असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. दोन्ही धान्याचे प्रति १ रूपया किलोप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापासूनच वितरण केले जाणार होते. त्यासाठी रास्त दर धान्य दुकानांमध्ये मका आणि ज्वारीचा पुरवठाही करण्यात आला. तथापि, पॉस मशीनवर या धान्याची नोंदच करण्यात आली नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांना धान्याचे वितरण करता येत नाही.

--------------

काही दुकानांत मका, ज्वारी पोहोचलीच नाही

जिल्ह्यातील काही रास्त दर धान्य दुकानांमध्ये शासन निर्णयानुसार वितरण करण्यासाठी मका आणि ज्वारीचा पुरवठा करण्याबरोबरच गव्हाचा पुरवठाही पूर्वीच्याच प्रमाणानुसार करण्यात आल्याने त्यांच्यापुढे साठवणुकीची अडचण निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे काही रास्त दर धान्य दुकानांमध्ये अर्धा महिना उलटला तरी मका, ज्वारीच पोहोचलेली नाही.

--------------

कोट : शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेचच पॉस मशीनवर मका, ज्वारीची नोंद होऊ शकली नाही. आता ती करण्यात आली असून, वितरणही सुरू झाले आहे. इतर रास्त दर धान्य दुकानदारांनी पडताळणी करून मका, ज्वारीचे ठरलेल्या प्रमाणानुसार वितरण करावे तसेच मागील महिन्याच्या प्रमाणानुसार काही ठिकाणी गव्हाचा पुरवठा झाला नव्हता. तो या महिन्याच्या सुरुवातीला झाल्याने पूर्वीच्या प्रमाणाएवढाच आहे. पुढे निर्धारित प्रमाणानुसार त्यात कपात होणार आहे.

- सुनील विंचनकर,

जिल्हा पुरवठा अधिकारी

--------------

कोट : शासन निर्णयानुसार मका, ज्वारीचे वितरण रास्त दर धान्य दुकानांतून केले जाणार आहे. यासाठी पुरवठा विभागाकडून काही ठिकाणी मका, ज्वारीचा पुरवठाही करण्यात आला. काही ठिकाणी मात्र तो अद्याप झालेला नाही. तसेच काही दुकानांमध्ये साठवणुकीचीही अडचण आहे. प्रशासनाने याची पडताळणी करून ती दूर करावी. पॉस मशीनच्या आधारेच या धान्याचे वितरण करता येणार आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांच्या या संदर्भातील अडचणीही दूर कराव्यात.

- प्रभाकर काळे,

जिल्हाध्यक्ष, रास्त दर धान्य दुकानदार संघटना

---------------