शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे ३०५ बीजोत्पादक काळ्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:53 IST

वाशिम : जिल्ह्यात महाबीजसाठी खरीप हंगामात बीजोत्पादन करणाऱ्या ३०५ शेतकऱ्यांना महाबीज व्यवस्थापनाने काळ्या यादीत टाकले आहे. या शेतकऱ्यांनी गतवर्षी ...

वाशिम : जिल्ह्यात महाबीजसाठी खरीप हंगामात बीजोत्पादन करणाऱ्या ३०५ शेतकऱ्यांना महाबीज व्यवस्थापनाने काळ्या यादीत टाकले आहे. या शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभाग घेऊनही सोयाबीनचे उत्पादन झाल्यानंतर ते उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विक्री केली होती. त्याची शहानिशा करून महाबीजच्या व्यवस्थापनाने या शेतकऱ्यांना काळ्या यादीत टाकले आहे.

वाशिम जिल्ह्यात गतवर्षी १० हजार ३५७ हेक्टर क्षेत्रावर महाबीजकडून बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात ३ हजार ४६६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यात सोयाबीनचे प्रमाण सर्वाधिक होते. जवळपास साडे सात हजार हेक्टरवर केवळ सोयाबीनचा बिजोत्पादन कार्यक्रम महाबीजकडून राबविला गेला. या कार्यक्रमांतर्गत उत्पादित शेतमालाची महाबीजकडून खरेदी केली जाते. ही खरेदी करताना शासनाचे हमीभाव किंवा बाजार समित्यांत जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात असलेले सर्वाधिक दर गृहीत धरले जातात. शिवाय त्यात २० टक्के आगाऊ रक्कमही शेतकºयांना बोनस म्हणून दिली जाते. गतवर्षी बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदीसाठी महाबीजने नमुने संकलित केले आणि त्याची उगवण क्षमता प्रयोगशाळेत तपासून घेतली. या प्रक्रियेअंतर्गत बियाणे पास झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी ३०५ शेतकऱ्यांनी महाबीजला बियाणे न देता ते खासगी बाजारात विकले. त्यामुळे महाबीजच्या व्यवस्थापनाने त्यांना नियमानुसार काळ्या यादीत टाकले. आता या शेतकऱ्यांना महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही.

---------------

दर वाढल्याने बाजारात विक्री

बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले सोयाबीन बाजार समित्यांमध्ये जानेवारी आणि डिसेंबर महिन्यात असलेले अधिकाधिक दर गृहित धरून महाबीजकडून त्याची खरेदी केली जाते; परंतु या दोन महिन्यांत सोयाबीनचे दर अधिकाधिक ४ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते, तर त्यानंतरच्या काळात बाजारात सोयाबीनचे दर सहा हजारांच्यावर पोहोचले आणि आता ते सात हजारांच्यावर आहेत. बाजारात वाढलेल्या दरामुळेच शेतकऱ्यांनी महाबीजऐवजी बाजारात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकले असावे.

--------------

काळया यादीतील शेतकऱ्यांची संख्या

तालुका शेतकरी

वाशिम १०५

मालेगाव ८९

रिसोड ८२

मं.पीर २९

--------------------

एकूण ३०५

-------

कोट : महाबीजच्या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेले बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास झाल्यानंतर करारानुसार महाबीजला देणे आवश्यक आहे. यंदा काही शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता चाचणीत पास होऊनही महाबीजला न देता खासगी बाजारात विकले. ही बाब निराशाजनक आहे. यामुळे महाबीजच्या बीजोत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

- डॉ. प्रशांत घावडे,

जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वाशिम