शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

मेडशीच्या वृध्द शेतक-याने मागीतली इच्छामरणाची परवानगी!

By admin | Updated: November 30, 2014 00:23 IST

शेतकरी म्हणतो, ‘प्रकल्पग्रस्त नव्हे, शासनग्रस्त!’

वाशिम: राज्यावर दुष्काळाची छाया अधीक गडद होत असतानाच, मालेगाव तालुक्यातील एका ७३ वर्षीय वृध्द शेतकर्‍याने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करुन इच्छामरणाची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे.आपली शेतजमीन शासनाला प्रकल्पासाठी दिल्यापासून आजतागायत न्यायालयाच्या पायरीशिवाय पदरात काहीच पडले नाही, अशी फिर्यादच मेडशीच्या श्रीराम सकरु राठोड यांनी मांडली त्यांच्या निवेदनाच्या माध्यमातून आहे. प्रकल्पासाठी जमीन दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्त म्हणून संबोधल्या जाते. प्रत्यक्षात आपण प्रकल्पग्रस्त नसून, शासनग्रस्त आहोत, असे श्रीराम राठोड यांनी म्हटले आहे. राज्यात आजवर अनेकदा सत्तांतर झाले. अनेक लोक मंत्री, मुख्यमंत्री झाले; परंतू प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही कायम आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न न्यायोचीत मार्गाने व प्राधान्याने कधीच सोडविल्या गेला नाही. उदरनिर्वाहाचे साधन असलेली शेतजमीन प्रकल्पासाठी दिल्यानंतर, मोबदल्यासाठी न्यायालयाची पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन देऊन, आपल्या पदरात न्यायालयाच्या पायरीशिवाय मिळते काय, असा उद्विग्न करणारा सवाल श्रीराम राठोड यांनी उपस्थित केला आहे. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली वडिलोपार्जीत जमीन आपण प्रकल्पासाठी दिली. बदल्यात न्यायालयाच्या पायरीशिवाय आपल्याला काहीच मिळाले नाही. आता वृध्दापकाळात न्यायालयाची पायरी चढणे शक्य होत नसल्याने, आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी राठोड यांनी वाशिमचे जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांना २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे. श्रीराम सकरु राठोड यांच्या निवेदनामुळे प्रकल्पांसाठी जमीन संपादित केल्या गेलेल्या शेतकर्‍यांची व्यथा अधोरेखीत झाली आहे.