शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एम. एस. गोटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:41 IST

वाशिम - शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित शिबिरांतर्गत १२ मार्च ...

वाशिम - शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित शिबिरांतर्गत १२ मार्च रोजी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे तर प्रमुख अतिथी म्हणून संजय गोटे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. व्ही. एन. लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे यांनी केले. त्यांनी भारताच्या पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत झालेल्या विविध चळवळींचा आणि स्वातंत्र्यवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये १८५७चा रणसंग्राम ते १९४२च्या चलेजाव आंदोलनापर्यंत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तसेच आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, मदनलाल धिंग्रा व सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल घटनांवर माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. व्ही. एन. लांडे यांनी १८५७च्या उठावातील नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, तात्या टोपे, बहादूरशहा जफर यांच्या कार्याची माहिती दिली. युवकांनी अशा थोर स्वातंत्र्यसेनानींचा आदर्श घेऊन देशासाठी स्वत:ला समर्पित करण्याचे आवाहन यावेळी केले. डॉ. जी. एस. कुबडे व संजय गोटे यांनी आज देशाला भारताच्या वास्तविक इतिहासाची, मिळालेल्या स्वातंत्र्याची जाणीव व जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो सहकार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. बी. चांदजकर यांनी केले. यावेळी डॉ. फिरोज खान, डॉ. एस. व्ही. रूक्के, डॉ. डी. आर. दामोदर, डॉ. डी. एन. लांजेवार, डॉ. व्ही. ई. डोणगांवकर, प्रा. बी. डी. पट्टेबहाद्दूर, डॉ. आर. जी. बोंडे आदींची उपस्थिती होती.