शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, लग्नाचे आमिष, अत्याचार अन् गर्भवती! अल्पवयीय मुलीचे शोषण : लग्नास नकार

By संतोष वानखडे | Updated: March 1, 2023 19:11 IST

तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले.

वाशीम : तुझ्यावर माझे नितांत प्रेम आहे, आपण लग्न करू अशी बतावणी करत एका अल्पवयीय मुलीचे लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून पुढे ती गर्भवती राहिली आणि त्याने लग्नास नकार देत तिला घरी पाठवून दिले. अखेरिस त्या मुलीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी १ मार्च रोजी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३५ वर्षीय महिलेने १ मार्च रोजी तक्रार दिली की, तिची १५ वर्षीय मुलगी ही मागील सहा महिन्यांपासुन आरोपी शेख राजिक शेख मोहमद रा.शेलुबाजार याच्यासोबत त्याचे घरी राहत होती. घरी परत ये असे मुलीला म्हटल्यानंतर तिने शेख राजिक व मी लग्न करणार असून, यामध्ये काही विघ्न आणल्यास जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे फिर्यादीने भीतीपोटी काही म्हटले नाही. परंतू, १५ फेब्रुवारीला फिर्यादीची अल्पवयीन मुलगी अचानक घरी परत आल्याचे पाहून तिला विचारणा केली. तिने आपबिती कथन करीत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

शेख राजिकने लग्नास नकार देत आईकडे परत जा, असा दम भरला. आरोपीने लैंगिक शोषण केल्याने ती चार महिन्याची गर्भवती असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. समाजात बदनामी होईल या भितीने पोलीस स्टेशनला तक्रार दिली नव्हती. परंतु १ मार्चला मोठी हिम्मत करीत तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी कलम ३७६, ३७६(२) एन भादंवी व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.आरोपीस अटक

लैंगिक शोषण केल्याची तक्रार प्राप्त होताच मंगरूळपीर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवित आरोपीस तातडीने अटक केली. या घटनेचा पुढील तपास एपिआय मंजुषा मोरे करीत आहेत.