शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल १0 वर्षांपासून शाळा तपासणीला ‘खो’!

By admin | Updated: July 27, 2016 00:58 IST

केवळ ५00 रुपये घेऊन वाशिममध्येच तपासले जातेय ‘रेकॉर्ड’; माध्यमिक शिक्षण विभागाचा ‘प्रताप’.

सुनील काकडे / वाशिमसन २00६ पासून आजतागायत १0 वर्षांचा मोठा काळ उलटूनही माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील एकाही शाळेची प्रत्यक्षात तपासणी झालेली नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे केवळ ५00 रुपये घेऊन कार्यालयातच शाळेचे 'रेकॉर्ड' तपासल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परिणामी, अनेक शिक्षण संस्थांमधील 'बोगस' कारभारावर एकप्रकारे 'अर्थपूर्ण' पडदा टाकण्याचा प्रकार घडत आहे. वाशिम जिल्ह्यात अनुदानित १९९, विनाअनुदानित ३६, इंग्रजी माध्यम ६ आणि स्वयंअर्थसहाय्यीत २२ अशा एकंदरित २६३ शाळांचा कारभार माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून पाहिला जातो. या शाळांची वेळोवेळी तपासणी व्हायला हवी. या माध्यमातून शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची दर्शविण्यात येणारी पटसंख्या आणि प्रत्यक्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचा ताळमेळ घालणे, हजेरीपत्रकावर ह्यबोगसह्ण स्वाक्षर्‍या करून गायब राहणार्‍या शिक्षकांवर अंकुश बसविणे, शाळांमध्ये पुरविल्या जाणार्‍या भौतिक सुविधा, शालेय पोषण आहार, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृहांची तपासणी होणे क्रमप्राप्त आहे; मात्र गेल्या १0 वर्षांपासून एकाही माध्यमिक शिक्षणाधिकार्‍याने इमानेइतबारे शाळा तपासणीची तसदी घेतलेली नाही. यातही गंभीर बाब म्हणजे जिल्ह्यातील शाळांमध्ये जावून प्रत्यक्ष तपासणी करण्याऐवजी केवळ ५00 रुपये घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातच शाळांच्या हजेरीपत्रकासह इतर ह्यरेकॉर्डह्णची तपासणी करून ह्यओकेह्णचा शेरा दिला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, शिक्षण विभागातील वरिष्ठांचा अशा प्रकारचा वरदहस्त असल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित सर्वच शिक्षण संस्थाचालकांना ह्यवाट्टेल तेह्ण करण्यासाठी रान मोकळे झाले आहे. शासनाकडून वर्षाकाठी लाखो रुपये अनुदान लाटणार्‍या शिक्षणसंस्था यामुळे दिवसेंदिवस गब्बर होत चालल्या असून, ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा मात्र पुरता खालावल्याचे चित्र आहे. कायमस्वरूपी शिक्षणाधिकार्‍यांचे पद १५ दिवसांपासून रिक्तमाध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक गिरी यांची येथून बदली झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून हे पद रिक्त आहे. सध्या प्रभारी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर, उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, वरिष्ठ लिपिक जी.एस.टाले आणि सहायक शिक्षण उपनिरीक्षक रवींद्र ठाकूर या तिघांसह जिल्ह्यातील विविध शाळांमधून प्रतिनियुक्तीवर बोलाविण्यात आलेले ६ कर्मचारी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा ह्यडोलाराह्ण सांभाळत आहेत.