शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मीटर रीडिंगला खो; ग्राहकांना भुर्दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:44 IST

विजेच्या वापरानुसार ग्राहकांना वीज देयकाची आकारणी होणे आवश्यक आहे. यासाठी मीटर रीडिंग अनिवार्य असून, महावितरणतर्फे एजन्सीची नियुक्तीदेखील केली आहे. ...

विजेच्या वापरानुसार ग्राहकांना वीज देयकाची आकारणी होणे आवश्यक आहे. यासाठी मीटर रीडिंग अनिवार्य असून, महावितरणतर्फे एजन्सीची नियुक्तीदेखील केली आहे. मात्र, एजन्सीकडून नियमित मीटर रीडिंग घेतले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना अव्वाच्या सव्वा देयके मिळत आहेत. काही ग्राहकांना अंदाजे देयक आकारणी होत असल्याने तीन, चार महिन्यांनंतर ३० ते ४० हजारांपर्यंत वीजदेयक दिले जात असल्याचे प्रकारही घडत आहेत. वीज देयकाचा भरणा वेळेवर न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणारे महावितरण, मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध कोणतीही कारवाई करीत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगत आहे.

ज्या महिन्यात मीटर रीडिंग घेण्यात आले नाही, त्या महिन्यातील देयक संबंधित ग्राहकाला यापूर्वीच्या सरासरी वीज वापरानुसार आकारले जाते. १०० युनिटपेक्षा जास्त युनिट झाले तर वीज आकारणी शुल्कातही वाढ होते. नियमित दरमहा मीटर रीडिंग न घेण्यामुळे १०० पेक्षा जास्त युनिट झाले तर अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड ग्राहकांना बसतो.

मीटर रीडिंग नियमित न घेणाऱ्या एजन्सीविरुद्ध महावितरण काय कारवाई करते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.

००००

संबंधित एजन्सीने मीटर रीडिंग नियमित घ्यावे, अशा सूचना दिलेल्या आहेत. मीटर रीडिंग घेतले नाही तर ‘अ‍ॅव्हरेज’नुसार देयक आकारणी केली जाते. मीटर रीडिंग नियमित होत नसल्यासंदर्भात ग्राहकांनी तक्रार केल्यास संबंधित एजन्सीविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते.

- आर. जे. तायडे

कार्यकारी अभियंता,

महावितरण, वाशिम