शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘चिलिंग चार्जेस’च्या नावाखाली ग्राहकांची लूट!

By admin | Updated: May 1, 2016 01:01 IST

अन्न व औषधी प्रशासन विभागाचे दुर्लक्ष.

कारंजा लाड: जिवाची लाहीलाही करणार्‍या उन्हात घशाची कोरड मिटविण्यासाठी शीतपेय आणि बाटलीबंद पाणी पिणार्‍या ग्राहकांकडून चिलिंग चाज्रेसच्या नावाखाली शहरातील काही ठिकाणी वारेमाप किंमत आकारून लूट करण्यात येत असतानाही अन्न व औषधी प्रशासन विभागाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. मागील तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जमिनीतील पाणी पातळी खोल गेली आणि सर्वच ठिकाणचे जलाशय कोरडे ठण पडत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले असताना मानव धर्माचे पालन करून जनसामान्यांची तहान भागविण्याऐवजी काही शीतपेय आणि बाटलीबंद पाण्याची विक्री करणार्‍यांकडून या स्थितीचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावर्षी उन्हाने कहर केला असून, ४४ अंशाचा पारा गाठलेल्या उन्हामुळे अंग भाजून निघत आहे. अखंड वाहणार्‍या घामाच्या धारांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने घशाला कोरड पडत आहे. घशाची हीच कोरड शमविण्यासाठी लोक शीतपेय किंवा बाटलीबंद पाण्याचा आधार घेत आहेत. त्यामुळे सहाजिकच शीतपेयांची मागणी वाढली आहे. याचा फायदा शीतपेय विक्रेते उचलत आहेत. प्रत्यक्ष छापील किंमत आणि ग्राहकांकडून घेण्यात येणारी किंमत यात ५ ते ६ रुपयांचा फरक दिसत आहे. काही ठिकाणी या पेक्षा अधिक घेतले जातात. या विषयी ग्राहकांकडून विचारणा झाली तर चिलिंग चाज्रेेंस असल्याचे शीत पेय विक्रेत्यांकडून सांगण्यात येते. उन्हाळ्यात वीज जास्त लागते त्यामुळे वीज बिलही जास्त येते. हा अ ितरिक्त चार्ज कंपनी देत नाही. म्हणून चिलिंग चार्जेस लावले जात असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वास् तविक कंपनीकडून सर्व खर्च व कमिशनसह वस्तूंची किंमत ठरवलेली असते. छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम ग्राहकांकडून घेऊ नये यासाठी वजनमापे नियंत्रण विभागाकडे नियम मोडणार्‍यांवर कारवाई करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मूळ किमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे हे बेकायदेशीर ठरवून कायदेभंग करणार्‍यांना दोन ते पाच हजार दंडाची शिक्षा व न्यायालयात केस दाखल होऊ शकते