शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गाव कृती आराखड्यावर पथकाची करडी नजर!

By admin | Updated: July 20, 2016 02:06 IST

तालुकानिहाय पथके गठित : ४९१ ग्रामपंचायतींसाठी कोट्यवधींचा निधी.

वाशिम: 'आमचं गाव-आमचा विकास' या उपक्रमांतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे धोरण अमलात आणले आहे. या निधीतून गावाचा विकास साधण्यासाठी गाव कृती आराखडे तयार केले जात आहेत. या दरम्यान कोणतीही दिरंगाई होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेमार्फत तालुकानिहाय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. ४९१ ग्रामपंचायतींसाठी जवळपास १४७ कोटी रुपयांच्या वर निधी मिळणार आहे.१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना विकासात्मक कामांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार लाखो रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीतून गावात कोणकोणती कामे करता येईल, याचा आराखडा ग्रामपंचायतींना गावकर्‍यांच्या सहकार्यातून व विश्‍वासातून तयार करावा लागणार आहे. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्हय़ात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तीन दिवसीय कार्यशाळा, प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिलेले आहेत. ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ातील ४९१ ग्रामपंचायतींनी कार्यशाळा, प्रशिक्षणाचा टप्पा पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. काही ठिकाणी कार्यशाळा, प्रशिक्षणाला कर्मचारी विलंबाने हजर राहतात, कधी-कधी ग्रामसेवकांसह अन्य कर्मचारी हजरच नसतात, आदी प्रकारच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी भरारी पथकांचे गठण केले असून, कामचुकार व दांडीबाज कर्मचार्‍यांवर ह्यऑन दी स्पॉटह्ण कारवाई करण्याचे अधिकार या पथक प्रमुखाला दिले आहेत. आतापर्यंत २२५ च्या आसपास ग्रामपंचायतींमध्ये तीन दिवसीय कार्यशाळा झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी दिली. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे ही प्रशिक्षणे होत नसल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यास ह्यऑन दि स्पॉटह्ण कारवाई केली जाणार आहे, असे सीईओ गणेश पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.