शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन वेळेत जबाबदार अधिका-यांच्या कक्षाला ‘कुलूप’!

By admin | Updated: October 9, 2016 01:37 IST

रिसोडच्या महिला, बालविकास कार्यालयातील प्रकार; ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये उघड झाला प्रकार.

विवेकानंद ठाकरे/शीतल धांडे रिसोड(जि. वाशिम),दि. 0८- येथील पंचायत समिती कार्यालय परिसरात असलेल्या महिला व बालविकास कार्यालयात कार्यरत अधिका-यांनी चक्क कार्यालयीन वेळेतच कार्यालयाला कुलूप लावून दांडी मारल्याचा धक्कादायक प्रकार ह्यलोकमत स्टिंग ऑपरेशनह्णमध्ये उघडकीस आला. पंचायत समितीत कार्यालयीन कामानिमित्त येणार्‍या नागरिकांच्या तक्रारींवरून ह्यलोकमतह्णने शहानिशा करण्यासाठी गुरूवारी महिला व बालविकास कार्यालयाचे ह्यस्टिंगह्ण केले. यादरम्यान महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक व विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ए.डी.ठाकूर हे दोघेही कार्यालयीन वेळेत स्वत:चे ऑफीस बंद करुन बाहेरगावी गेल्याचे कार्यालयात उपस्थित असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षकांनी सांगितले. कार्यालयाच्या दुस-या विभागात तीन अंगणवाडी सेविका व दोन कंत्राटी कर्मचारी आढळून आले. त्यांना संबंधित गैहजर अधिकार्‍यांबाबत विचारणा केली असता, कार्यालयातील कर्मचारी हजेरीपट व हलचल रजिस्टर उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवार हा दिवस रिसोड तालुक्यातील आठवडी बाजाराचा दिवस असतो. याच दिवशी तालुक्यातील प्रत्येक गावातून गोरगरीब लोक बाजार व कार्यालयीन कामकाज, या दुहेरी उद्देशाने शहरात येतात. महत्वपूर्ण असलेल्या या दिवशी कार्यालयात आलेल्या नागरिकांना महिला व बालविकास कार्यालय बंद असल्याने निराश होत परतावे लागले. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंंंड पडण्यासोबतच मानसिक त्रास देखील सहन करावा लागला. काही महिला तर साहेब येतील, या आशेने सायंकाळपर्यंंत ऑफीससमोर बसलेल्या आढळून आल्या. कार्यालयात कार्यालयीन एकही कर्मचारी तसेच शिपाई सुध्दा हजर नसल्याचे यावेळी आढळून आले. गैरहजर कर्मचारी व अधिका-यांचे रजेचे अर्ज देखील कार्यालयात नव्हते. याच परिसरात पंचायत समितीमधील काही कर्मचारी व अधिका-यांनी कार्यालयीन वेळेत दांडी मारल्याचे आढळून आले. यातील काही कर्मचार्‍यांची हजेरी पटावर स्वाक्षरी आहे. परंतु महिला व बालविकास कार्यालयातील कर्मचार्‍यांबाबत असे काहीच आढळले नाही. नागरिकांच्या तक्रारींवरून करण्यात आले 'स्टिंग ऑपरेशन'पंचायत समिती परिसरात असलेल्या महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी व कर्मचारी आठवड्यातील तीन ते चार दिवस कार्यालयात कधीच हजर नसतात, अशा नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यावरून ह्यलोकमतह्णने शहानिशा करण्यासाठी गुरूवारी ह्यस्टिंग ऑपरेशनह्ण करून प्रत्यक्ष पाहणी केली असता, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मदन नायक व विस्तार अधिकारी ए.डी.ठाकूर यांच्यासह इतर कर्मचारीही गैरहजर आढळले. विशेष गंभीर बाब म्हणजे हे कार्यालय चक्क कुलूपबंद असल्याचे यावेळी निदर्शनास आले.