शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३४० शेतक-यांना तातडीच्या कर्जाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने शेतकºयांना तातडीच्या १० हजार रुपये कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून, ३१ आॅगस्ट ही त्याची अंतिम मुदत आहे. असे असताना बँकांनी  अवलंबिलेल्या ढिसाळ धोरणामुळे जिल्ह्यात शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत केवळ ३४० शेतकºयांनाच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकला आहे. याशिवाय कर्जमाफीची ‘आॅनलाइन’  प्रक्रियाही ‘सर्व्हर डाउन’ची समस्या आणि ...

ठळक मुद्देकर्जमाफीची ‘आॅनलाइन’ प्रक्रियाही वांध्यात!वाशिम जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाने शेतकºयांना तातडीच्या १० हजार रुपये कर्जाचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले असून, ३१ आॅगस्ट ही त्याची अंतिम मुदत आहे. असे असताना बँकांनी  अवलंबिलेल्या ढिसाळ धोरणामुळे जिल्ह्यात शनिवार, ५ आॅगस्टपर्यंत केवळ ३४० शेतकºयांनाच या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकला आहे. याशिवाय कर्जमाफीची ‘आॅनलाइन’  प्रक्रियाही ‘सर्व्हर डाउन’ची समस्या आणि ‘नेट कनेक्टिव्हिटी’अभावी वांध्यात सापडल्याने शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.राज्य शासनाने जाहीर केलेल्या पीक कर्जमाफीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस वेळ लागणार असल्याने शेतकºयांना खरीप हंगामातील पिकांसाठी आवश्यक खत, कीटकनाशक  खरेदीसाठी १० हजार रुपये अग्रिम कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाने १४ जून २०१७ रोजी आदेश काढला; परंतु अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी अद्याप केलीच नाही. प्रशासनाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, ५ आॅगस्टपर्यंत विदर्भ ग्रामीण कोकण (२१९ शेतकरी) आणि अकोला जिल्हा मध्यवर्ती (५८ शेतकरी) या दोन बँकांनी २७७ शेतकºयांना २७ लाख ७० हजार रुपये अग्रिम कर्जापोटी वाटप केले. हा अपवाद वगळता जिल्ह्यातील इतर सर्व बँकांनी मिळून केवळ ६३ शेतकºयांना ६३ हजार रुपये कर्जवाटप केल्याची गंभीर स्थिती आहे. दरम्यान, तातडीच्या १० हजार रुपये अग्रिम कर्जवाटपाची शेवटची मुदत ३१ आॅगस्ट २०१७ असून, शेवटच्या तारखेपर्यंतही या आकड्यात फारशी वाढ होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.