शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित फाइल्सची यादी फलकावर लावा!

By admin | Updated: March 4, 2017 02:02 IST

मुख्य कार्यकारी अधिका-यांचे निर्देश; स्थायी समितीच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा.

वाशिम, दि. ३-या ना त्या कारणाहून नेहमीच चर्चेत राहणार्‍या वित्त विभागात सुसूत्रता आणणे आणि गैरसमज दूर करण्याच्या दृष्टिकोनातून यापुढे प्रलंबित फाइल्स्ची यादी वित्त विभागाच्या फलकावर लावण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले. यासंदर्भात स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर पाटील यांनी उपरोक्त निर्देश दिले.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात शुक्रवारी दुपारी २ वाजता सुरू झालेल्या स्थायी समितीच्या पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, तर व्यासपीठावर उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, समाजकल्याण सभापती पानुताई दिलीप जाधव, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद आदींची उपस्थिती होती. विविध विभागाच्या फाइल्स् वित्त विभागात प्रलंबित राहतात, निर्धारित वेळेपेक्षाही अधिक काळ त्या फाइल तशाच पडून राहतात, असा आरोप सदस्यांनी केला. यासोबतच काही कर्मचारीदेखील वित्त विभागात फाइल पडून आहे, असे सांगतात हा मुद्दा सभेत चर्चेत आला. यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी येवले यांनी प्रलंबित फाइल्स्चा अहवाल दर आठवड्याला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना देत असतो, असे सांगितले. यापुढे कामकाजात सुसूत्रता यावी. तसेच कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून दर आठवड्यात प्राप्त होणार्‍या फाइल आणि प्रलंबित फाइल याचा लेखाजोखा एका फलकावर (बोर्ड) लावावा, असे स्पष्ट निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ताथोड यांनी समाजकल्याण विभागाशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले. सभेला समाजकल्याण अधिकारी गैरहजर असल्याने कुणाला जाब विचारावा, असा मुद्दाही सदस्यांनी उपस्थित केला. तसेच राज्याच्या समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त हेदेखील गत एका वर्षापासून सभेला उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे तांडा वस्ती सुधार योजनेवर चर्चा करता येत नाही, असे सदस्यांनी पीठासीन अधिकार्‍यांच्या निदर्शनात आणून दिले. गैरहजर अधिकार्‍यांविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केल्या. उंबर्डा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची शिकस्त झालेली इमारत संबंधित मुख्याध्यापकांनी वरिष्ठांची लेखी परवानगी व आवश्यक ते प्रशासकीय सोपस्कार न करताच परस्पर पाडली कशी, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे यांनी उपस्थित केला. यावर संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी दिनकर जुमनाके यांनी दिले. कारंजा येथील गटशिक्षणाधिकार्‍यांनी गतवर्षी परस्पर बदली कशी केली, शिवनगर येथून किन्ही रोकडे येथे एका शिक्षकाची बदली कोणत्या अधिकारात केली, असा प्रश्नही गारवे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाचीदेखील चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जुमनाके यांनी दिली. बदली केल्यानंतरही गटशिक्षणाधिकार्‍यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनात का आणून दिली नाही, या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास एफआयआर दाखल करा, अशा सूचना गणेश पाटील यांनी केल्या.