शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दारु दुकानांचे परवाने वांध्यात!

By admin | Updated: July 11, 2017 02:00 IST

दुसऱ्या मोजणीतही अंतर कमीच : मान्यतेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक जय भवानी नगरच्या हद्दीत नव्याने सुरू झालेल्या वाइन शॉपीचे अंतर सोमवारी पुन्हा मोजण्यात आले. यावेळी पाचशे मीटरपेक्षा कमी अंतर भरल्याचे आढळून आले. त्यामुळे हा परवाना वांध्यात सापडणार, यात शंका नाही.संबंधित दोन्ही दुकाने कायमस्वरुपी बंद करण्यात यावी व या दुकानांना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली होती. राज्य उत्पादक शुल्काच्यावतीने राज्य महामार्गापासून पाचशे मीटरच्यावर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावरील जागेत देशी-विदेशी दारुचे दुकान सुरू करण्याचा परवाना देण्याचा नियम आहे. तथापि, राज्य उत्पादक शुल्क विभागाने संबंधित विभागाच्या साहाय्याने राज्य महामार्गापासून मोजणी करून संतोष श्रीराम जैस्वाल यांच्या वाइन शॉपचे अंतर ५०० मीटर असल्याचे तसेच सुभाष कनिराम राठोड यांचे देशी दारुचे दुकान ५०० मीटर असल्याचे दाखवून त्यांना परवाना दिला. यावर परिसरातील नागरिकांनी आक्षेप घेतला असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सायकल यंत्राने अंतर मोजण्यात आले. त्यावेळी सदर अंतर ४९८ मीटर असल्याचे निष्पन्न झाले होते. यावरही हा गुंता कायम होता. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी राज्य महामार्गापासून सदरचे अंतर मोजण्यासाठी एक समिती गठित केली होती. या समितीने प्रत्यक्ष अंतर मोजले असता, देशी दारुचे दुकान ४९०.७५ मीटर तर वाइन शॉप ४९३.५० मीटर एवढे आढळून आले. हा अहवाल समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात व दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रसंगी सतीश वानखेडे (गल्लाभाऊ), किरण सोमाणी, नियोजन सभापती अमित मानकर, गजानन खटके, गजानन ठेंगडे, माजी नगरसेवक भीमकुमार जीवनानी, नीलेश जैस्वाल, उमेश मुंदडा, विजय रंगभाळ, राजू दिग्रसकर, किशोर पेंढारकर, रवि पेंढारकर, पवन पेंढारकर, पिंटू रोकडे, चंदू चव्हाण, गणेश ठेंगडे, अजय भालेराव, तनवीर खान, रवी दिग्रसकर, नितीन पेंढारकर, गजानन दिग्रसकर आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.