शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनदान महागले!

By admin | Updated: June 21, 2014 00:35 IST

रक्तघटकाच्या दरात घसघसीत वाढ: सर्वसामान्यावर वाढला बोझा.

वाशिम : दात्यांकडून घेतलेले रक्त व त्यामधील घटकांवर प्रक्रिया करून ते सुरक्षितपणे साठविण्याची प्रक्रिया खर्चिक बनल्यामुळे रक्ताचे दर दुप्पटीकडे झेपावले आहेत. केंद्र शासनाने जानेवारी महिन्यामध्येच सुधारित दरपत्रक जारी केले होते. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही सुधारित दरपत्रक जारी केले असून त्यामध्ये अवघ्या ८५0 रुपयांना मिळणार्‍या रक्तपिशवीची मूळ किंमत तब्बल १ हजार ४५0 रुपये करण्यात आले आहेत. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! आज रक्ताचे दर वाढल्यामुळे जीवनच महागले, अशा प्रतिक्रिया रुग्णांकडून ऐकावयास मिळत आहेत. रक्ताचे दर वाढविण्याच्या मागणीसाठी दि फेडरेशन ऑफ नागपूर ब्लड बँकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने राज्य रक्त संक्रमण परिषदेने एक समिती गठित केली. या समितीमध्ये खासगी रक्तपेढी, रेडक्रॉस, शासकीय रक्तपेढी व अन्न व औषधी प्रशासनाच्या प्रतिनिधींसह एकूण १६ सदस्यांचा समावेश होता. या समितीने केलेल्या पाहणीमध्ये रक्तसंकलनानंतर रक्त व रक्तघटकांवर करावी लागणारी प्रक्रिया अधिक खर्चिक बनल्याचे निदर्शनास आले. तसेच अद्ययावत यंत्रांद्वारे तपासण्या केलेले रक्त रुग्णांना पुरविण्यासाठी रक्तपेढ्यांना न परवाडणार्‍्या दरात वितरित करावे लागत होते. याचा परिणाम रक्ताच्या सुरक्षिततेवरही जाणवत होता. अभ्यास समितीने या बाबी राज्य रक्त संक्रमण परिषदेसमोर मांडल्यामुळे रक्ताचे दर वाढविण्याचा निर्णय झाला असुन सदर परिपत्रक जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले आहे.