शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार अर्थसाहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

वाशिम : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसाहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...

वाशिम : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसाहाय्य म्हणून १५०० रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून सर्व परवानाधारक रिक्षाचालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. यामध्ये रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबत सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

कडक निर्बंधाच्या काळात रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य म्हणून १५०० रुपये इतके देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी सर्व परवानाधारक रिक्षाचालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. परवानाधारक रिक्षाचालकास शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालयामार्फत अर्जातील नमूद तपशिलाची कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करून अर्जदाराच्या बॅंक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने कार्यालयात येण्याची व उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरताना अडचण आल्यास कार्यालयाच्या मदत कक्षात ९८३४५५९७९७ या दूरध्वनीवर संपर्क साधता येणार आहे.

रिक्षाचालकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज कार्यालयीन तसेच सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहे, असे हिरडे यांनी सांगितले.

असा करावा ऑनलाईन अर्ज...

शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करताना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. या ऑनलाईन अर्जात वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, आधार क्रमांक नमूद करावा लागेल. वारसदार असल्यास तो पर्यायही निवडावा लागेल. आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते हे परस्परांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य आहे. आपल्या अर्जाची प्रत्यक्ष स्थिती अर्जदार आपल्या मोबाईलवर तपासू शकतो.