शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पेपर सोडवून परतणा-या विद्यार्थ्यावर काळाचा घाला !

By admin | Updated: March 5, 2017 02:14 IST

वाशिमजवळ दुचाकीला अपघात, एक जण गंभीर

वाशिम, दि. ४- बारावीचा पेपर सोडवून दुचाकीने घरी परतणार्‍या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातला. काटा मार्गावरील चौफुलीवर झालेल्या अपघातात शंकर सुर्वे या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान घडली. चिखली सुर्वे येथील शंकर निळकंठ सुर्वे (वय १८) व वाघजाळी येथील वैभव उध्दवराव इढोळे (वय १८) हे दोघे बारावीत शिकतात. शनिवारी राज्यशास्त्राचा पेपर असल्याने दोघेही दुपारी घरुन दुचाकीने काटा येथील परीक्षा केंद्रावर गेले होते. सायंकाळी ६ वाजता पेपर सुटल्यानंतर दोघेही दुचाकीने घरी परत येत असताना वाशिम पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या चौफुलीवर ट्रॅक्टरने मोटरसायकलला जबरदस्त धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, शंकर सुर्वे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वैभव ईढोळे गंभीर जखमी झाला. वैभवला तत्काळ अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद नव्हती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळाच्या हद्दीबाबत संभ्रम ! ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द शहरापासून पाच कि.मी. अंतरावर असल्याचे फलक लावण्यात आले. परंतू अनेक घटनांमध्ये हद्दीसाठी शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांमध्ये नेहमीच संभ्रम होतो. या संभ्रमामुळे घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी बराच विलंब होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. पोलीस अधिक्षकांनी पोलीस स्टेशन हद्दीबाबत दोन्ही पोलीस स्टेशनला स्पष्ट सूचना दिल्यास हा संभ्रम कायमचा दूर होऊ शकतो.