शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चला वाशिमला सुंदर घडवू या ...नगर परिषदेची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 13:59 IST

वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले.

ठळक मुद्देनगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला. ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे.

वाशिम - वाशिम शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी नगर परिषदेने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषद प्रशासनाने केले.शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध असून, नागरिकांनीदेखील सहकार्य केल्यास शहर स्वच्छ होण्याला फारसा वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी व्यक्त केला. शहरातील गटार साफ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाहीत, अशा  एक ना अनेक प्रकारच्या तक्रारीसाठी आता नागरिकांना नगर परिषदेत येण्याची गरज नाही. केंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने विकसित केलेल्या ‘स्वच्छता अ‍ॅप’वर नागरिकांना घरबसल्या तक्रार नोंदविता येणार आहे. कोणीही केवळ स्मार्ट फोनच्या साहाय्याने घरी बसून किंवा ये-जा करताना, शहरात फेरफटका मारताना अगदी कुठूनही विनासायास क्षणार्धात तक्रार नोंदवू शकणार आहे. ‘स्वच्छता अ‍ॅप’ वापरण्यास अगदी सुलभ आहे, अशी माहिती मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी दिली. सदर अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर पसंतीची भाषा निवडावी लागणार आहे. अ‍ॅप हा आपला मोबाईल नंबर मागेल, तो योग्य जागी नमूद करावा. तुम्हाला लगेच ‘ओटीपी’ (वन टाईम पासवर्ड) मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा (पोस्ट यूवर फर्स्ट कम्प्लेंट) वर क्लिक करावे लागेल. आता अस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे त्या जागेचा छायाचित्र काढावे आणि नंतर सर्वसाधारणपणे आढळणाºया तक्रारी जसे मृत प्राणी आहे, कचºयाचा ढीग आहे, कचरा गाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल त्यावर क्लिक केल्यानंतर,  त्या परिसराचे लोकेशन व लँडमार्क ( स्थळ व लगतची ठळक खूण) टाईप करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्क्रीनवर खालीच ‘पोस्ट करा’ शब्द दिसताच, त्यावर क्लिक केले की तक्रार पोहोचल्याचा संदेश दिसणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शेटे यांनी दिली. तक्रार नोंदविल्यानंतर, सदर तक्रार नगर परिषदेच्या संबंधित कार्यालयाकडे आणि नंतर संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाºयांकडे पाठविली जाईल.तक्रार निवारण करून तक्रार असलेल्या जागेचा तक्रार निवारणानंतरचे छायाचित्र काढून पाठविणार आहे. सदर छायाचित्र संबंधित नागरिकाससुद्धा तात्काळ दिसणार आहे. या सर्वेक्षणात सदर अ‍ॅपचा जास्तीत जास्त वापर करणाºया शहरांसाठी विशेष गुण राखून ठेवले आहेत. वाशिम नगर परिषदेची रँक ही देशभरात २२४ अशी आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान