---------------
गुरांना तोंडखुरी, पायखुरीचे लसीकरण
वाशिम : उन्हाचा पार वाढत असल्याने गुरांना तोंडखुरी, पायखुरीच्या आजाराची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने गुरांना या रोगावर नियंत्रणासाठी लसीकरण सुरू केले आहे. गुरुवारी काही गावांत ही मोहीम राबविण्यात आली.
-------------------
आमदार निधीतून सभामंडपाचे काम
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत विविध कामे केली जात असताना गुरवारी आमदार विकास निधीतून येथे सभामंडपाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा आधार होणार आहे.
-------------
स्पर्धेंतर्गत नद्यांचे खोलीकरण
वाशिम : समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत असलेल्या नाल्यांसह नद्याचे खोलीकरण केले जात आहे. यात कारंजा तालुक्यातील येथे कमळगंगा नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासह गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.