शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१0२४ पथकांद्वारे कुष्ठरुग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:57 IST

वाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत प्रधानमंत्री प्रगती योजनेमध्ये जिल्हय़ात कुष्ठरुग्ण शोधमोहीम ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १0२४ पथकाद्वारे जिल्हय़ातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येची तपासणी अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हय़ातील ११ लाख लोकसंख्येची होणार तपासणी कुष्ठरुग्ण शोध अभियान मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गंत प्रधानमंत्री प्रगती योजनेमध्ये जिल्हय़ात कुष्ठरुग्ण शोधमोहीम ५ सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत १0२४ पथकाद्वारे जिल्हय़ातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येची तपासणी अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.       सदर  मोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन मार्गदर्शक सूचना व चर्चा करण्यात आली. या मोहिमेत जिल्हय़ातील ग्रामीण भागातील संपूर्ण लोकसंख्या व शहरी भागातील झोपडपट्टी भाग व काही निवडक भागचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, व्यक्तींची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या १0२४ पथकामध्ये क्षेत्रीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्यसेवक, सेविका, तसेच आशा कार्यकर्ती, स्वयंसेवक यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार आहे. समाजामध्ये लपून राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना विनाविकृती औषधोपचाराखाली आणून कुष्ठरोगाचा प्रसार खंडित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. तसेच या मोहिमेत कुष्ठरोगाविषयी जनजागृती करून कुष्ठरोग बहुविविध औषधोपचार पद्धतीने पूर्णपणे बरा होतो, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.  या कार्यासाठी नेमणूक केलेल्या पथकामार्फत घरोघरी जाऊन शोध घेतल्या जाणार आहे. या पथकांवर वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली त्यांच्या कार्यक्षेत्रात अभियान राबविले जाणार आहे.  सदर समितीमध्ये सहायक संचालक  डॉ. अश्‍विनकुमार हाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार, डॉ. एस.व्ही. मेहकरकर, अ.जि.आ. अधिकारी लोणारे, बढे, ठाकरे तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी यांचा समावेश आहे. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. 

जनजागृतीची माध्यमेकुष्ठरोग शोधमोहिमेत विद्यार्थ्यांतर्फे जनजागृतीसह प्रभातफेरी, दवंडी, मंदिर-मशीदसह ग्रामपंचायतमार्फत ध्वनिप्रेक्षकामार्फत जनजागृती केल्या जाणार आहे.

जिल्हय़ात ५ ते २0 सप्टेंबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या कुष्ठरुग्ण शोध अभियानामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपली कुष्ठरोगविषयी तपासणी करून घ्यावी. तसेच मोहीम कालावधीमध्ये आपल्या घरी येणार्‍या आरोग्य पथकास सहकार्य करून कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करून मोहीम यशस्वी करावी.- डॉ. अश्‍विनकुमार हाके,सहायक संचालक, आरोग्यसेवा वाशिम.