शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 16:18 IST

Corona Vaccination Awareness Campaign मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

वाशिम : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, अमरावती विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ १ मार्च रोजी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, निवासी जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी सोनखासकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणाविषयी लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करणे हा या जनजागृतीमागील उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत डिजिटल चित्ररथ वाशिम शहर तसेच जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, मानोरा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात जावून कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत विषयी प्रचार व प्रसिद्धी करणार आहे. या चित्ररथ निर्मितीकरिता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे. डिजीटल चित्ररथाद्वारे जिल्ह्यात दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले. या मोहिमेकरीता अंबादास यादव, श्रीकांत जांभुलकर यांनी संयोजन केले. शाहीर मधुकर गायकवाड आणि संच हे कोरोना आणि आत्मनिर्भर भारत याविषयी कलापथकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसwashimवाशिम