शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी ‘सीएमपी’ प्रणालीचा जिल्ह्यामध्ये शुभारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:37 IST

जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, तसेच अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमार्फत होत असल्याने वेतन ...

जिल्हा परिषद व खासगी अनुदानित, तसेच अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारऱ्यांचे वेतन शालार्थ प्रणालीमार्फत होत असल्याने वेतन खात्यावर जमा होण्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागत होते. त्यामुळे वेतन जमा होण्यासाठी विलंब होत होता. याबाबत शिक्षक संघटनांनी आवाज उठविला, तसेच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्याशी चर्चा केली. शिक्षक आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक यांनीसुद्धा मंत्रालय स्तरावर ही प्रणाली सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला, तसेच शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनीदेखील वेतनातील विलंब दूर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांनी यासंदर्भातच जिल्हास्तरीय समितीचे गठन करीत ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम तयार केला. अखेर ३० जुलै रोजी जिल्ह्यात ‘सीएमपी’ प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, आमदार अ‍ॅड. किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक, सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, शिक्षणाधिकारी आर.डी. तांगडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

००००००

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा!

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा १ तारखेला करण्यात यावे, असा आदेश शालेय शिक्षण विभागाने यापूर्वीच दिलेला आहे. मात्र, वेतनास दोन- दोन महिने विलंब होत होता. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता ‘सीएमपी’ प्रणालीद्वारे वेतन होण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम निश्चित झाल्याने वेतन नियमित होणार आहे. त्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.