शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीला अखेरची घरघर

By admin | Updated: August 10, 2014 22:29 IST

दुय्यम निबंधक कार्यालय अज्ञात व्यक्तिंच्या नासधुसीने हैराण झाले आहे.

रिसोड: खरेदी-विक्रीचे व्यवहार सक्षमपणे पेलणारे येथील दुय्यम निबंधक कार्यालय अज्ञात व्यक्तिंच्या नासधुसीने हैराण झाले आहे. गत काही महिन्यांपूर्वी रेकॉर्ड रुमच्या काचा फोडल्या असून, आवारभिंतही अनेक ठिकाणी पाडली आहे. या परिसरातच जनावरे बांधली जात असल्याने दुय्यम निबंधक कार्यालय आहे की कोंडवाडा? असा प्रश्न निर्माण होतो.खरेदी-विक्री व्यवहाराच्या नोंदी करून त्या नोंदीचे जतन करण्याची जबाबदारी दुय्यम निबंधक कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहाराशिवाय अन्य जबाबदार्‍याही या कार्यालयावर सोपविल्या आहेत. रिसोड येथे दुय्यम निबंधक कार्यालय सिव्हिल लाईनच्या मुख्य मार्गालगत मटन मार्केटला लागून आहे. स्वतंत्र जागा उपलब्ध आहे. इंग्रजकालिन बांधकाम असल्याने इमारत जुनी झाली आहे. मुख्य इमारतीच्या बाजूला रेकॉर्ड रुम आहे. या कार्यालयाला चारही बाजूने आवारभिंतीचे कुंपन आहे. मात्र, रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत तसेच आवारभिंतही काही ठिकाणी पाडली आहे. कार्यालय परिसरात एका कोपर्‍यात केरकचरा टाकण्यात येतो. दुसर्‍या कोपर्‍यात जनावरे बांधण्यात येतात. त्यामुळे कोंडवाड्याचे स्वरुप या परिसराला येत आहे. बाजूलाच मटन मार्केट असल्याने घाणपाणीही कार्यालयाच्या परिसरात फेकल्या जाते. एकंदरित विविध समस्यांनी या कार्यालयाला ग्रासले आहे. अज्ञात इसमांकडून रात्रीच्या सुमारास नासधुस होत असल्याने संबंधित कर्मचारीही हतबल ठरत आहेत. पोलिस विभागाने रात्रीच्या गस्तीच्या वेळी या कार्यालयाकडे लक्ष दिल्यास नासधुस करणारी टोळी जेरबंद होऊ शकते. रेकॉर्ड रुमच्या खिडक्या सुरक्षित असणे गरजेचे बनले आहे.