शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जमीन देणारेच सिंचनाच्या लाभ क्षेत्रातून वगळले

By admin | Updated: September 3, 2014 00:50 IST

वारा लघु सिंचन प्रकल्पग्रस्ताना सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वगळले.

देपुळ : वारा (ज.) बृहत लघु पाटबंधारे विभाग सिंचन प्रकल्पाच्या निर्मितीसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीपैकी ५0 टक्के जमीन देणार्‍या प्रकल्पग्रस्त उमरा (शम) देगाव व बोरी (बु.) येथील शेतकर्‍यांना या सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वगळण्याचा उपक्रम लघुपाटबंधारे विभाग क्रं. ३ च्या अधिकारी कर्मचारी यांनी केला. हा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यावर अन्याय आहे. जमीन देणार्‍या शेतकर्‍यांचा पाणी वापरण्याचा हक्क हिरावून घेणार्‍या लपाविक्रं. ३ ला धडा शिकवून शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देवू त्यासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल असा पवित्रा शिवसेनेच्या वारा (ज) सर्कलच्या पं.स. सदस्या सुनिल दादाराव धनगर यांनी घेतला आहे.वारा जहागीर बृहत लपावि सिंचन प्रकल्पासाठी ६५0 हेक्टर जमीन संपादन करण्यात आली. यावर १00 कोटी पेक्षा जास्त खर्च होत आहे. यापासून १ हजार ७९0 हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणार आहे. हे सिंचन काही कॅनॉल काही लिफ्टद्वारे होणार आहे. या सिंचन प्रकल्पासाठी लागणार्‍या ६५0 हेक्टर जमिनीपैकी ५0 टक्के जमीन उमरा (शम) व बोरी (शिवारातील) संपादन करण्यात आली. मात्र या गावांना लाभ क्षेत्रापासून दुर ठेवण्याचा अन्यायी उपक्रम लपावि क्रं. ३ ने केला आहे. यामध्ये त्यांनी वारा (जहाँगीर) ४९७ हेक्टर देपुळला ६२४ हेक्टर काजळांबाला २७९ हेक्टर लहीला १0२ हेक्टर कुंभीला ५५ हेक्टर वसंतवाडीला ४५ हेक्टर आणि चुकांबाला १८८ हेक्टर असे एकूण १ हजार ७९0 हेक्टर सिंचन क्षेत्र लाभक्षेत्र म्हणून वाटून दिले आहे. तर प्रकल्पामध्ये ५0 टक्के जमीन केलेल्या उमरा (शम) बोरी देगावला शून्य हेक्टर लाभ क्षेत्र दिले आहे. हा घणाघाती अन्याय आहे. उमरा (शम) देगाव, एकांबा, बोरी गावाला लाभ क्षेत्रात समाविष्ठ करावे, अशी मागणी गतवर्षी माजी राकाँ जिल्हाध्यक्ष नथ्थुजी कापसे तथा संजय मापारी यांनी केली होती. परंतु लपाविक्र ३ ने या मागणीला केराची टोपली दाखविली. यावर तात्काळ या गावांना लाभ क्षेत्रात समाविष्ट न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पं.स. सदस्या सुनिता धनगर यांनी संबधितांकडे निवेदनाव्दारे दिला आहे.