खामगाव (बुलडाणा): शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकान व एमआयडीसीमधील एक घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. स्थानिक बोबडे कॉलनी भागात राहणारे संतोष रामराव टाले यांचे कॉटन मार्केटसमोर न्यू ब्रह्म अँग्रो सेंटर नाम दुकान आहे. काल मध्यरात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर दुकानाच्या मागील बाजूच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील वेगवेगळ्या कंपन्यांचे आठ मोटारपंप असे ५३ हजार तसेच ६८ हजार रुपयांचा लॅ पटॉप लंपास केला. तर दुसर्या घटनेत एमआयडीसी भागातील रहिवासी महादेव सुखदेव राठोड (अरुण अँग्रो प्रॉड्क्टस) हे घराला कुलूप लावून कुटुंबासह कार्यालयात झोपले होते. त्यामुळे ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी महादेव राठोड यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला व आलमारीमधील नगदी ४0 हजार, २४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन पोत असा एकूण ६४ हजारांचा ऐवज लंपास केला. दोन्ही घटनेत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुकान व घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास
By admin | Updated: February 11, 2015 01:04 IST