शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची लेक सीमेवर लढणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

वाशिम : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देऊन आता मुलींनाही लष्करात दाखल होता येणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण ...

वाशिम : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देऊन आता मुलींनाही लष्करात दाखल होता येणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यामुळे ‘एनसीसी’मध्ये दाखल मुलींमधून आनंद व्यक्त होत आहे.

सध्या मुली किंवा महिला चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी किंवा डेहरादून येथील इंडियन मिल्ट्री अकॅडमी या संस्थांसाठीची प्रवेश परीक्षा देऊन लष्करात दाखल होतात; मात्र मुली, महिलांनी ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करात दाखल होण्याची तरतूद नव्हती. याविरोधात ॲड. कुश कार्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर १८ ऑगस्ट रोजी न्या. संजय किशन कौल आणि न्या. ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने निर्णय देत मुलींना ‘एनडीए’ची परीक्षा देण्याचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे येत्या ५ सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ‘एनडीए’च्या परीक्षेत मुलीही सहभागी होऊ शकणार आहेत.

...........................

काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल?

सुप्रीम कोर्टाने १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार आता मुलींनाही राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा येत्या ५ सप्टेंबरला होणार आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ सप्टेंबरला होणार असून निर्णयाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि जाहिरात करण्याचा आदेश कोर्टाने ‘यूपीएससी’ला दिला आहे.

.......................

लष्करात प्रवेशासाठी...

एनडीए’, ‘आयएमए’ आणि ‘ओटीए’ या तीन माध्यमांद्वारे लष्करात प्रवेश करता येतो. त्यातील ‘आयएमए’ आणि ‘ओटीए’च्या माध्यमातून मुलींना लष्करात प्रवेश मिळतो; मात्र ‘एनडीए’तून मुलींना प्रवेश दिला जात नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हा प्रश्नही आता निकाली निघाला आहे.

...............

दोन शहरात एनसीसीच्या ३० मुली

जिल्ह्यातील वाशिम शहरात असलेल्या श्री बाकलीवाल विद्यालयात १५ आणि मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेत १५ अशा एकूण ३० मुली सध्या एनसीसीमध्ये दाखल आहेत. त्यातील इच्छुक मुलींना आता ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करात दाखल होता येणार आहे.

................

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार !

लष्करात दाखल होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच बाळगले आहे. त्यामुळेच एनसीसीमध्ये दाखल झाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ‘एनडीए’ची परीक्षा देता येणार असल्याने आनंद झाला आहे.

- श्रुती शिंदे

..........

आतापर्यंत मुलांनाच ‘एनडीए’ची परीक्षा देऊन लष्करामध्ये दाखल होता येत होते. सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हा अधिकार आता मुलींनाही बहाल केला. त्यामुळे कोर्टाचे मन:पूर्वक आभार !

- सायली कांबळे

..........

शालेय जीवनात ‘एनसीसी’चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला लष्करातच दाखल व्हायचे आहे. या माध्यमातून देशसेवा करण्याचे स्वप्न आपण बाळगले आहे. सुप्रीम काेर्टाच्या निर्णयाने मोठा आनंद झाला.

- भारती देशमुख