शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांअभावी कामकाजाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

.................. पशू दवाखाना इमारतींची दुरवस्था वाशिम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरात आठ ठिकाणी पशू दवाखाने कार्यान्वित आहेत. या दवाखान्यांच्या इमारतींची ...

..................

पशू दवाखाना इमारतींची दुरवस्था

वाशिम : पशुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हाभरात आठ ठिकाणी पशू दवाखाने कार्यान्वित आहेत. या दवाखान्यांच्या इमारतींची अवस्था मात्र अत्यंत वाईट झाली आहे. त्यामुळे पशुपालकांसह कार्यरत कर्मचाऱ्यांना उपचारकार्यात अडचण निर्माण झाली असून, संबंधित यंत्रणेने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

...................

जि.प.मध्ये नो-पार्किंग नियमाचे उल्लंघन

वाशिम : येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरात वाहने उभी करण्यासाठी टिनशेडसह पुरेशी जागा निश्चित करण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी मोजकेच नागरिक वाहने उभी करतात. इतर अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून प्रवेशद्वारासमोरच वाहने उभी करत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

..................

कनेक्टिव्हिटीअभावी अनसिंगवासी त्रस्त

वाशिम : ग्रामीण भागात विविध मोबाईल कंपन्याचे टाॅवर उभे असतानादेखील योग्य प्रमाणात इंटरनेट नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे विशेषत: बँकांचे व्यवहार प्रभावित होत आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

.............

वाशिम-केकतउमरा रस्ता प्रश्न प्रलंबित

वाशिम : वाशिम येथून केकतउमरा या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यापूर्वी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हा प्रश्न आजही प्रलंबित असून ग्रामस्थांमधून रोष व्यक्त होत आहे.

..............

क्रीडा संकुल उभारणीची मागणी

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे अनेक महिने मैदानी खेळांवर निर्बंध लादण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून हे निर्बंध शिथिल झाल्याने खेळाडूंना दिलासा मिळाला. आता तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारणीच्या कामालाही गती मिळावी, अशी मागणी खेळाडूंमधून होत आहे.

.......................

दुर्धर आजारग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

रिसोड : हृदयरोग, किडनी व कर्करोग, आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता जि.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येकी १५ हजारांचे अर्थसाहाय्य दिले जाते. सन २०२० मध्ये २७ प्रस्ताव मंजूर झाले असून, संबंधितांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.

................

स्मशानभूमींसाठी अतिरिक्त निधीची प्रतीक्षा

वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत भवन उभारण्याकरिता १५ कोटींचा अतिरिक्त निधी मिळणार आहे; मात्र हा प्रश्न अनेक महिन्यांपासून मार्गी लागलेला नाही. यामुळे कामेही प्रलंबित आहेत. विशेषत: सुसज्ज स्मशानभूमी नसल्याने अनेक गावांमधील ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

..............

कोरोनापासून बचावासाठी खबरदारी घ्या!

वाशिम : कोरोनाचे संकट बहुतांशी निवळले आहे; मात्र संकटाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुठलीच हयगय न करता कोरोनापासून बचावासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.